केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत मोठ्या गटातून मोहपूर शाळेने तर लहान गटात सिंदगी तांडा शाळेने मिळविला पहिला क्रमांक

शालेयवृत्त सेवा
0

जि.प.प्रा.शाळा सिंदगीगाव येथे केंद्रस्तरीय सांस्कृतिक कला स्पर्धा महोत्सव उत्साहात संपन्न



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा सिंदगीगाव येथे केंद्रस्तरीय सांस्कृतिक कला स्पर्धा महोत्सव उत्साहात संपन्न झाली.  श्री महामुने साहेब ग. शि.अ ,सौ.बडगीरे मॅडम शि.वि.अ., श्री परमेश्वर खोकले सरपंच सिंदगी मो,दत्ता मारोती चिकने उपसरपंच सिंदगी मो ,श्री बालाजी वानखेडे पोलीस पाटील, श्री प्रेमसिंग नाईक माजी पं.स.सदस्य, श्री बबन वानखेडे भा ज पा ता.उपाध्यक्ष,श्री कवटीकवार सर कें प्र, श्री जोशी सर के.मु,श्री रमेश खुपसे केंद्र प्रमुख मारेगाव,शरद कुरूंदकर के.मु.अ.कमठाला,चंद्रशेखर सर्पे मान्यवरांच्या हस्ते रंगमंचाचे उदघाटन झाले.


या स्पर्धेत मोहपूर केंद्रातील चार शाळेने लहान गटात 1ते4 तर दोन शाळेनी मोठ्या गटात 5ते8 असा सहभाग नोंदविला या कार्यक्रमातून प्रत्येक शाळने एकापेक्षा एक सुंदर नृत्य आविष्कार प्रेक्षकांसमोर सादर केले,या स्पर्धेत विविध हिंदी ,मराठी गाण्यावर आधारित शेतकरी, वारकरी, रीमिक्स ,आदिवासी ढेमसा, अश्या नाविन्यपूर्ण गाण्यातून रसिकांचे मन जिंकले.


मोठ्या गटातून प्रथम विजेते ठरले कें प्रा शाळा मोहपूर, उत्तेजनार्थ पारितोषिक उ प्रा शाळा सिंदगीतांडा तर लहान गटातून प्रथम पारितोषिक उ प्रा शा सिंदगी तांडा, द्वितीय प्रा शा सिंदगीगाव ,तृतीय के प्रा शा मोहपूर, उत्तेजनार्थ पारितोषिक प्रा शा पांधरा या शाळांनी पटकावले. परीक्षक म्हणून श्री कुरुंदकर सर , श्री खूपसे सर , श्री चंद्रशेखर सर्पे यांनी भूमिका बजावली.तसेच श्री शेख इब्राहिम सर, प्रदिप पवार सर उपस्थित होते.


या कार्यक्रमासाठी सिंदगी मो आणि केंद्र अंतर्गत बेल्लोरी पांधरा आंजी मोहपूर खेडी व परिसरातून किमान दोन हजाराच्या आसपास प्रेक्षकांनी कार्यक्रमास हजेरी लावली.या कार्यक्रमाचे आयोजन जि प प्रा शा सिंदगीगावचे  मुख्याध्यापक श्री अचकुलवार सदानंद  यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कुडमेते सर,श्री पोटे सर ,श्री डुडुळे सर, सिंदगीगाव व सिंदगीतांडा येथील सर्व तरुण मंडळी,जेष्ठ नागरिक,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परमेश्वर खोकले,उपाध्यक्ष राहुल उमरे व सर्व सदस्य, यांच्या सहकार्याने अतिशय सुंदर करण्यात आले.


कार्यक्रमा नंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना भोजन देण्यात आले.सिंदगीगावातील प्रत्येक शिक्षक,ग्रामस्थ यांच्याकडे वेगवेगळी नियोजित कामे दिलेली असल्याने कार्यक्रमाची यशस्वीता वाढली..कार्यक्रमासाठी प्रत्येक नागरिकांनी भरभरून प्रेम दिले व बक्षिसांचा वर्षाव केला,मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले,कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. अचकुलवार सर मुख्याध्यापक सिंदगीगाव यांनी केले तर सूत्रसंचालन श्री डुडूळे रामेश्वर सर व श्री नितिन बैस यांनी केले.शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)