जुने धडगाव व सिसा बीटस्तरीय क्रिडा महोत्सव संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

पंचायत समिती धडगाव गटविकास अधिकारी सी.टी गोस्वामी होते अध्यक्षस्थानी





नंदुरबार ( गोपाल गावित ) :

धडगाव तालुक्यातील केंद्र जुने धडगाव व बीट सिसा क्रिडा महोत्सव दोन दिवसीय समारंभाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती धडगाव गटविकास अधिकारी सी.टी गोस्वामी होते.  विद्येचे दैवत सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन गटविकास अधिकारी सी. टी गोस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य रूपसिंग तडवी, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र बच्छाव, शिक्षण विस्तार अधिकारी शिलवंत वाकोडे साहेब बीट सिसा शिवसेना धडगाव तालुका अध्यक्ष महेश पाडवी, पंचायत समिती सदस्या सोनियाताई वळवी, पंचायत समिती सदस्य वर्षा पटले, पंचायत समिती धडगावचे शालेय पोषण आहार अधीक्षक आपसिंग पावरा, पंचायत समिती सदस्य  विलासराव पाडवी, बिजरी गावाचे सरपंच मोगराबाई पटले, स्वरूपसिंग वसावे उपसरपंच, पोलीस पाटील गोपा पटले, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजय वसावे यांच्या शुभहस्ते क्रीडा महोत्सवाचे फीत कापून करण्यात आले. 


बीट मधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा बिजरी येथील चिमुकल्यांनी स्वागत गीत गाऊन करण्यात आले. कबड्डी, खो -खो , लंगडी , रस्सीखेच इ सांघिक खेळ घेण्यात आले. पंच रामदास पावरा, विजय पराडके, मिटकरी, नटवर पावरा, पंडित गवळी, सोमनाथ कोकणी, आट्या पावरा, राजेंद्र पावरा, गोविंद‌ वळवी पंच म्हणून काम पाहिले. क्रिडा स्पर्धा बिजरी येथे जुने धडगाव आणि सिसा बीटस्तरीय क्रिडास्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. बिजरी येथे सिसा बीटाच्या बीटस्तरीय क्रिडास्पर्धा संपन्न झाल्या. जुने धडगाव आणि सिसा केंद्रातील एकूण 56 जिल्हा परिषद शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. 


पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती गणेशदादा पराडके, जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पराडके  पंचायत समिती धडगाव सभापती हिराताई पराडके, पं.स सदस्य दिलीपदादा  पाडवी, बिजरी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तथा माजी पं. स.सदस्य दारासिंगदादा पटले यांच्या शुभहस्ते विजेत्यांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव  करण्यात आले.  शिक्षण सभापती जि.प. नंदुरबार गणेशदादा पराडके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी खास करुन शारिरिक विकासासाठी क्रिडा स्पर्धांचे आगामी काळात आयोजन करण्याकरिता जिल्हा परिषद स्तरावर भरीव आर्थिक तरतूद करण्याचे जाहीर केले. 


सिसा व जुने धडगाव केंद्रातील शिक्षकांमध्ये रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आल्या व विजयी शिक्षक संघ जुने धडगाव दरेकर प्रदिप यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कबड्डी, खो -खो , लंगडी , रस्सीखेच इ सांघिक खेळ घेण्यात आले. पंच रामदास पावरा, विजय पराडके, मिटकरी, नटवर पावरा, पंडित गवळी, सोमनाथ कोकणी, आट्या पावरा, राजेंद्र पावरा, गोविंद‌ वळवी , अमरसिंग वळवी, नारायण जगताप, प्रमोद देवरे, शशीकला सुयॆवंशी, सुवर्णा पाटील, माधुरी पारमवाळ, गोविंद वळवी, धनराज गावीत, किशोर तडवी यांनी विविध खेळांचे पंच म्हणून उत्कृष्ट काम पाहिले. क्रिडा स्पर्धा बिजरी येथे जुने धडगाव आणि सिसा बीटस्तरीय क्रिडास्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. जुने धडगाव आणि सिसा केंद्रातील एकूण 56 जिल्हा परिषद शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. 


सांघिक स्पर्धा ज्यात खो-खो, कबड्डी, लंगडी, रस्सीखेच अशा स्पर्धा घेण्यात आल्या. वैयक्तिक स्पर्धा ज्यात धावणे शर्यत, लांब उडी, उंच उडी, लिंबू चमचा, धावणे रीले स्पर्धा इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्यात. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक सर्वांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्या विद्यार्थींना बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेत आगळा वेगळा आनंद अनुभव मिळाला.सदर क्रिडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सिसा बीट शिक्षण विस्तार अधिकारी शिलवंत वाकोडे, जुने धडगाव केंद्रप्रमुख करणसिंग वसावे, सिसा केंद्रप्रमुख खेमसिंग वळवी, धडगाव तालुका शिक्षक पतपेढी चेअरमन रामचंद्र पटले, अनिल पाडवी, महाराष्ट्र जुनी पेन्शन योजना संघटना धडगाव तालुकाध्यक्ष धिरसिंग वसावे, सिसा व जुने धडगाव केंद्रातील समस्त शिक्षकवृंद व बिजरी गावातील समस्त ग्रामस्थ व प्रतिष्ठित व्यक्ती  व बिजरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचे अनमोल सहकार्य लाभले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)