जयनगर केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

शहादा तालुक्यातील जयनगर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा श्री चक्रधर माध्यमिक विद्यालय जयनगर येथे केंद्रस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शहादा तालुक्याचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून, दीप प्रज्वलनाने अत्यंत उत्साहात संपन्न झाले. 


यावेळी प्रमुख पाहुणे शहादा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डी. टी वळवी, तसेच वडाळी बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश माळी, तसेच जयनगर केंद्राचे केंद्रप्रमुख आर बी माळी, श्री चक्रधर माध्यमिक शाळेचे प्राचार्य आय.डी माळी तसेच पदोन्नती मुख्याध्यापक मनोहर पाटील, तसेच केंद्रीय मुख्याध्यापक भोई सर, बीआरसी विषय शिक्षिका प्रतीक्षा पाटील तसेच सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, उपस्थित होते. केंद्रातील 12 शाळांनी सहभाग  100 खेळाडू यांनी नोंदविला होता. 



गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, लहान वयातच विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होऊन क्रीडा क्षेत्रात प्रगती होण्यासाठी जयनगर केंद्राने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव दिला पाहिजे. असेही मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गावाच्या परिसरातील ग्रामस्थांनी हजेरी लावली. गटशिक्षण अधिकारी डी टी वळवी यांनी सांगितले की , विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर स्वतःच्या आत दडलेल्या क्रीडा कलागुणांना प्राधान्य द्यावे. ग्रामीण भागात या क्रीडा प्रकारांचे महत्व पटवुन देवून जास्तीत जास्त खेळाडू निर्माण कसे होतील यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. पुढील वाटचालीसाठी  खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 


गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस पारितोषिक वितरण करण्यात आले. जयनगर केंद्रामध्ये ज्या शाळेने जास्त बक्षीस जिंकले आहेत त्यांना जयनगर केंद्राच्या वतीने फिरतीढाल देण्यात आली. तसेच विविध प्रकारच्या खेळामध्ये प्रथम द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धांद्री खुर्द शाळेचे शिक्षक श्रीकांत जगताप यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उभादगड शाळेचे शिक्षक मन्मथ बरडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)