धनाजे केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( गोपाल गावित ) :

धडगाव तालुक्यातील धनाजे केंद्र अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडास्पर्धेचे अध्यक्ष श्रीमती विजयाताई पावरा व मान्यवरांच्या शुभहस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आले.


      यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते  फत्तेसिंग पावरा , पंचायत समिती धडगावचे  शिक्षण विस्तार अधिकारी  शिलवंत वाकोडे, धनाजे केंद्राचे केंद्रप्रमुख रतिलाल खर्डे, बहादूर पावरा, दोमदा पावरा, पंडित कुशाल पावरा, निर्मल पटले, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, बंधू भगिनी  उपस्थित होते.


         मान्यवरांच्या हस्ते क्रीडास्पर्धेची सुरुवात मशाल प्रज्वलित करून संचालनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा या संघाचे 'हम होंगे कामयाब' हे संचलन करतानाचे गीत मुख्य आकर्षण ठरले. 


       या स्पर्धेसाठी  इयत्ता १  ली व २ री यांचा लहान गट, इयत्ता ३ री ते ५ वी मध्यम गट व इयत्ता ६ वी ते ८ वी साठीचा मोठा गट असे गट पाडण्यात आले होते. लहान गटासाठी झिगझग रनिंग , स्टँडिंग जम्प, लिंबू चमचा , दोरीवरच्या उड्या, धावणे या स्पर्धा घेण्यात आल्या. मोठया गटासाठी धावणे, लांब उडी, उंच उडी, खो-खो, कबड्डी, लंगडी तर मोठया गटासाठी लांब उडी, उंच उडी, धावणे, खो- खो कबड्डी या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. 


       खो-खो, कबड्डी, लंगडी मुले व मुली या सर्व सांघिक स्पर्धेचे प्रथम बक्षीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काल्लेखेतपाडा या संघाने उत्तुंग कामगिरी केली. वैयक्तिक क्रीडा प्रकारात काल्लेखेतपाडा, केंद्र शाळा धनाजे बु, कुंभारपाडा, उमराणी बु, पाटीलपाडा धनाजे,  धनाजे खु|| , तलावडीपाडा , उमराणी खु,  डुमटीपाडा, जुनी मुंगबारी, निमझरीपाडा, थुवानी या संघामध्ये मोठी चुरस होताना दिसली. 



      अत्यंत चुरसीच्या या क्रीडा स्पर्धेत दिवसाभरात खेळाडूंच्या चेहऱ्यावरच्या उत्साहाला बक्षीस वितरण कार्यक्रमात आणखी झळाळी मिळाली. काल्लेखेतपाडा चे खेळाडू भरत पावरा, सुरज पावरा, सुवर्णा पावरा, गणेश पावरा, रविना पावरा, राणी पावरा, अनिता वळवी , वंदना पावरा, वैशाली पावरा तर केंद्र शाळा धनाजे बु चे खेळाडू लक्ष्मी पावरा, रवींद्र पावरा, शुभम पावरा , खुशी पावरा , नंदनी पावरा, विक्रम पावरा, अभय पावरा  उमराणी बु चा खेळाडू संतोष पावरा, कल्याणी पावरा,  धनाजे खु ची खेळाडू रुचिता पावरा, दर्शना पावरा, प्रतीक्षा पावरा, उमराणी खु चे निकिता पावरा, प्रगती पावरा, पाटीलपाडा चे खेळाडू दिव्या पावरा , कुंभारपाडा चा खेळाडू इरफान तडवी, सुनंदा पटले,  तलावडीपाडा ची खेळाडू प्रतिभा राहसे, साहिल तडवी, निमझरी पाड्याची ची खेळाडू  रोशनी पावरा डुमटीपाड्याचा रघुवीर पावरा यांनी दिवसभरात अत्यंत लक्षवेधी कामगिरी करत सांघिक व वैयक्तिक बक्षिसांची लयलूट केली. 


       केंद्रप्रमुख रतिलाल खर्डे व मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण करून क्रीडास्पर्धेची सांगता करण्यात आली. धडगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र बच्छाव, राजबर्डी बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी शामराव ईशी यांनी सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. 


     क्रीडास्पर्धा यशस्वी होण्यासाठी धनाजे केंद्रातील सर्व शिक्षक मोठया उत्साहात सहभाग घेतला. पंच, गुणलेखक, भोजन समिती, आरोग्य समिती, सत्कार समिती, मुख्य क्रीडा  नियोजन समिती यांनी नियोजन पूर्वक उत्साहात संपन्न झाल्या. क्रीडा स्पर्धेचे सूत्रसंचालन लक्ष्मीपुत्र उप्पीन यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)