शिष्यवृत्ती परीक्षेस भरघोस प्रतिसाद ; विद्यार्थी उपस्थिती 96 टक्के

शालेयवृत्त सेवा
0

मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे मॅडमचे वेळोवेळी प्रेरणादायी मार्गदर्शन



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

     शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या भविष्यातील येवू घातलेल्या अनेक स्पर्धा परीक्षेंचा पाया असतो. शिष्यवृत्ती परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे बाळकडूच या लहान वयापासूनच मिळत असते. नेमक्या याच बाबींचा पाया पक्का व्हावा,या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत दरवर्षी राज्यात पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5 वी व माध्यमिक इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले जाते. 


       नांदेड जिल्ह्यात 12 फेब्रुवारी रोजी झालेल्या या परीक्षेस विद्यार्थ्यांनी प्रचंड व भरघोस प्रतिसाद नोंदवित 96 टक्के उपस्थिती दिली आहे. पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता 5 वीसाठी जिल्ह्यातून 16 तालुक्याच्यावतिने प्रश्नपत्रिका एकसाठी 24044 विद्यार्थी परीक्षेस बसले होते,त्यापैकी 23231 विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. प्रश्नपत्रिका दोनसाठी 24044 पैकी 23221विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. ही एकूण टक्केवारी 96.57 टक्के नोंदविण्यात आली. माध्यमिक इयत्ता 8 वीसाठी प्रश्नपत्रिका एकसाठी 18039 विद्यार्थी परीक्षेस बसले होते,त्यापैकी 17326 विद्यार्थी उपस्थिती नोंद झाली तर प्रश्नपत्रिका दोनसाठी 18039 पैकी 17319 विद्यार्थी उपस्थित होते. ही एकूण टक्केवारी 96 टक्के नोंदविण्यात आली. 



       जि.प.नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी वेळोवेळी प्रेरणादायी मार्गदर्शनातून शिष्यवृत्ती परीक्षेचे महत्त्व विविध बैठकीतून व्यक्त केल्यामुळे डॉ सौ.सविता बिरगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक सोळा तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांना प्रोत्साहित करुन शिष्यवृत्ती परीक्षेची आवश्यकता पटवून दिल्यामुळे जिल्ह्यात शिष्यवृत्तीमय वातावरणात निर्मिती झाली आणि यातूनच या परीक्षेची टक्केवारी 96 टक्के होण्यास सहाय्यक ठरली आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील वर्ग एक व वर्ग दोन अशा बत्तीस अधिकार्यांच्या भरारी पथका मार्फत शहाण्णव परीक्षा केंद्रावर भेटी देवून सुरळीतपणे परीक्षा संपन्न झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)