नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
सलाम मुंबई फाऊंडेशन २००७ पासून शिक्षण व आरोग्य विभागाच्या सहकार्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून, भारत देशातील युवकांना सुरक्षित व तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. तंबाखू नियंत्रणाच्या क्षेत्रात तरुण चॅम्पियन म्हणून शालेय विद्यार्थ्यांची भूमिका अधिक प्रभावी व्हावी यासाठी एक व्यासपीठ निर्माण केले आहे ते म्हणजे बालपरिषद होय. ह्या ऑनलाइन बालपरिषदेच्या माध्यमातून भारत देशातील ०५ राज्यामधून ३५० शालेय विद्यार्थी त्यांना आलेले अनुभव मांडणार आहेत. तसेच मंचावर उपस्थित अधिकाऱ्यांना प्रश्न हि विचारणार आहेत.
ह्या ऑनलाइन बालपरिषदेस तंबाखूमुक्त शाळा असलेले जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारताळा येथील विद्यार्थिनी चैतन्या हिला मिळाली समवेत तिचे मार्गदर्शक शिक्षक रवी ढगे उपस्थित राहणार सदरील बाल परिषदेचे परिषदचे यूट्यूब च्या माध्यमातून सर्वत्र प्रसारण होणार ग्रामीण भागातील एखाद्या विद्यार्थिनीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्टेज उपलब्ध झाल्याची ही पहिलीच वेळ असून याबद्दल विद्यार्थिनीचे व शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .