राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षकांना पदोन्नतीत तात्काळ संधी द्या - शिक्षक संघटनेची मागणी

शालेयवृत्त सेवा
0

   

              


गडचिरोली ( शालेय वृत्तसेवा ) :

राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त शासन सेवेतील उपक्रमशील शिक्षकांना त्यांच्या उच्च शैक्षिणिक अहर्तप्रमाणे राज्यातील केंद्रप्रमुख / विस्तार अधिकारी / गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी व उप- संचालक तथा सत्सम रिक्त पदांवर पदोन्नतीत तातडीने संधी द्या, अशाप्रकारची मागणी आतापर्यत सर्व खासदार / आमदार/ शिक्षणमंत्री / ग्राम विकासमंत्री / उप - मुख्यमंत्री / मुख्यमंत्री तथा शिक्षण आयुक्त - शिक्षण सचिव शालेय यांचेकडे राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त राज्य संघटनेच्या वतीने वारंवार निवेदन देऊन करण्यात आली. 


सर्व महोदयांनी निवेदन स्विकारतांना सकारात्मक प्रतिसाद देऊन समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. परंतू आजपर्यंत त्याबाबतीत कोणतेही शासन निर्णय / परिपत्रक जाहिर करण्यात आलेले नाही. तसेच आदरणीर नामदार श्रीमान देवेंद्रजी फडणवीस , उप- मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी नागपूर येथील भेटीत राज्य शिष्टमंडळाला राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील / उच्च शिक्षित शिक्षकांच्या सर्व समस्या तातडीने सोडविण्याचे सकारात्मक  आश्वासन राज्य शिष्टमंडळाला दिले.आचारसंहिता संपताच सर्व समस्यांचा / प्रलंबित मागण्यांचे समस्या निराकरण करण्यात असे सकारात्मक आशावादी आश्वासन दिले. परंतु राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशिल शिक्षकांचे सर्वंच प्रश्न पुर्वप्रमाणे प्रलंबितंच आहेत. 


मा. उच्च न्यायालयाने राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षकांना कायमस्वरूपी 2 ( दोन ) वेतनवाढी द्या, असा निर्णय देऊनही राज्यात व जिल्ह्यात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षकांच्या मनात नैराश्यंच निर्माण झालेले आहे. तेव्हा राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षकांना पदोन्नतीत 10% आरक्षण देऊन त्यांचेकडे असलेल्या उच्च शैक्षणिक अहर्तप्रमाणे त्यांना शैक्षणिक विविध पदांच्या पदोन्नतीत आरक्षण द्या, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटना , जिल्हा शाखा , गडचिरोलीचे वतीने पुनश्च करण्यात येत आहे. तेव्हा राष्ट्रीय / राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षका़च्या समस्या निराकरणाची मागणी करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)