अवघड क्षेत्रातील पांगरपहाड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांने शिष्यवृत्ती परिक्षेत मिळविले उत्तुंग यश..

शालेयवृत्त सेवा
0

 

गटशिक्षणाधिकाऱ्याने केले शिक्षकांचे कौतुक !




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुका मुख्यालयापासून 58 किलोमीटर अंतरावर तेलंगणा सीमेवरील अतिदुर्गम अवघड क्षेत्रातील पांगरपहाड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे त्यांचा शंभर टक्के निघाला असून सहापैकी चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक पात्र ठरले आहेत याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. 


नुकताच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 2022 चा निकाल जाहीर झाला आणि अवघड क्षेत्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरपहाडणे भव्य दिव्य यश संपादन केले आहे. या शाळेतील कार्तिक विनोद जाधव, अक्षय जितेश जाधव, गायत्रीदेवी सुनील जाधव, अस्मिता रवींद्र राठोड हे चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक पात्र ठरले असून तनवी संतराम जाधव व कृष्णा विक्रम जाधव शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे गुणी जण विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक अनिल कांबळे व शिक्षक सचिन सरवदे यांचे गटशिक्षणाधिकारी अनिल कुमार महामुने, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, अप्पारावपेठचे केंद्रीय मुख्याध्यापक प्रमोद रत्नाकर, केंद्रप्रमुख सत्यनारायण कोड उत्तम कानिंदे, राजा तामगाडगे, सचिन धाकडे यांनी कौतुक केले आहे.

 

" या गावातून भ्रमणध्वनीवरून संदेश द्यायचा असेल तर पाण्याच्या टाकीवर चढावं लागतं तेव्हा कसा बसा संपर्क होतो येथे ना नेट ना नेटवर्क परंतु गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांच्या ' मिशन 500 स्कॉलर ' या उपक्रमांतर्गत आम्ही मेहनत घेतली. सहशिक्षक सचिन सरवदे यांनी यासाठी प्रचंड सराव केला त्याचाच परिश्रम व मार्गदर्शन हे यश आहे. "

- अनिल कांबळे (मुख्याध्यापक )

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)