असा रंगला चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम !

शालेयवृत्त सेवा
0

 

प्रजासत्ताक दिनी ग्रामस्थाने केला शिक्षक आणि सैनिकाचा गौरव.....




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील लोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.


लोणी गावाच्या सरपंचा बेबीबाई भिमराव कुरसंगे, उपसरपंच सीमा विजय पावडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन लोंढे, केंद्रप्रमुख विजय मडावी यांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरवात करण्यात आली. यावेळी झेंडीगुडा येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक मोहिते, लोणीचे उपाध्यक्ष हनुमंत गुंजकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोपीनाथ पाटील, शिक्षणप्रेमी विजय पावडे, योगेश राघू  उपस्थित होते.




तब्बल तीन तास चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्तूत शाळेचे शिक्षक रमेश मुनेश्वर आणि शिक्षिका शाहिन बेग यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी यांनी तर आभार विद्या श्रीमेवार या शिक्षिकेने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम शिक्षण समितीचे पदाधिकारी, ग्राम पंचायत सर्व पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, युवक मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.



कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यार्थ्यांच्या स्वागत गिताने झाला. त्यानंतर कु. श्रृती गुंजकर हिचे 'मी जीजाऊ बोलतेय' , कु. त्रीशा मेंडलकर हिचे 'मी सावित्री बोलतेय' , प्रतिक गुंजकर याचा 'मी मावळा बोलतोय', कु. प्रांजल गुंजकर हिचे 'मी झांशीची राणी ' आणि मारोती मेंडलकर याचा 'मी बिरसा मुंडा बोलतोय ' अशा विविध एकपात्रिचे सादरीकरण करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.



नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच.. या बालगीतावर प्रिती, आरूषी, आर्यन , शिवम, स्वरा, श्रेयस, श्रद्धा, वैष्णवी ने सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर श्रेया, पायल, मंत्रा, प्रतिमा, लक्ष्मी  यांनी सवारी भवानी चौकामधी.. या गीतावर बहारदार नृत्य केलं. त्यानंतर मारुती मेडलकर या विद्यार्थ्याने 'काठी न घोंगड घेऊ द्या की र.. या लोकगीतावर भन्नाट नृत्य करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. त्यानंतर सम्रदा, पूर्वी, श्रुती, प्रांजल, ज्योती, रूपाली या मुलीने 'आई तुझ देऊळ ' या गीतावर सुंदर नृत्य करून बक्षीसं मिळविले. त्यानंतर प्रतीक, काशिनाथ, सुरज, निशांत, साईनाथ या विद्यार्थ्याने 'ओ देश मेरे तू जीता रहे.. या देशभक्ती गीतावर सुंदर असं सादरीकरण केलं. गुण गुण गुणारे.. या गीतावर श्रुती, त्रिशा, तेजश्री, अक्षरा या मुलीने सुंदर असे नृत्य केलं.  ' कहते है हमको प्यार से इंडिया वाले.. या देशभक्ती गीतावर आरती, श्रेया, राधा, काजल, तनु हिने अप्रतिम नृत्य केलं.



तनु बादड या बालिकेने 'सामी सामी.. या गीतावर भन्नाट नृत्य करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. 'गोमू माहेरला जाते हो नाखवा.. या कोळीगीतावर त्रीशा, श्रृती, तेजश्री, अक्षरा हिने सुंदर नृत्य केलं. 'असो बरकत धुळ पेरणीला.. या शेतकरी गीतावर राधा, पल्लवी, वीर, योगेश, मारुती, ऋतिक, साईनाथ ने ताल धरला तर आदिवासी संस्कृतीची झलक 'ढेमसानृत्य ' पूर्वी, प्रांजल, ज्योती, सम्रदा, पायल ने बहारदार नृत्य करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्योती राम कोसरे या विद्यार्थीनीनी इंग्रजीतून भाषण केले तर पूर्वी, ज्योती, प्रांजल, श्रृती, प्रतिक ने इंग्रजीतून ड्रामा सादर केला. शेवटी महाराष्ट्राची लावणी 'चंद्रा गाण्यावर पूर्वी धुर्वे हिने जबरदस्त नृत्य करून लोकांची मने जिंकली.





ग्रामपंचायतने केला शिक्षक आणि सैनिकाचा गौरव..

लोणीच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा पांडुरंग कुलकर्णी, शिक्षिका श्रीमती शाहीन गुलाबराव बेग, श्रीमती विद्या किशनराव श्रीमेवार, शिक्षक श्री. रमेश यादवराव मुनेश्वर, झेंडिगुड्याचे मुख्याध्यापक श्री. परमेश्वर विठ्ठलराव महामुने आणि शिक्षिका श्रीमती अनुसया लक्ष्मण वाकोडे  यांना  'गौरवपत्र' देऊन सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी लोणीचे सुपुत्र भारतीय वीर जवान सैनिक नागेश रामदास किनाके यांचा विशेष सत्कारकरण्यात आला.






टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)