जि प प्रा शाळा गणेशपूर जुने येथे बाल आनंदमेळावा उत्साहात साजरा..

शालेयवृत्त सेवा
0

 



 नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील जि.प.प्रा.शा.गणेशपूर (जुने) शाळेत प्रथमच वार्षिक स्नेहसंमेलना  निमित्त बाल आनंद मेळावा / आनंदनगरी मेळावा घेण्यात आला .त्यावेळी गावचे जेष्ठनागरिक श्री.तुकाजी आत्राम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले . शा.व्य.स.अध्यक्ष श्री.विजय मेश्राम , सरपंच श्रीम.अनुसया तडसे,प्रमुख पाहुणे श्री सी.एम.सरपे सर,श्रीम.भगत मॅडम,श्रीम.यलमेवाड मॅडम श्रीम.वाढई मॅडम , मॅडम,श्री.शंकर पिल्लेवार काका व काकू आणि मोठ्या संख्येत गावातील  सर्वच नागरीक उपस्थित होते.


शाळेतील काही विद्यांर्थ्यानी अनेक खाद्यपदार्थ, फळे , हत्तीला शेपूट लावणे व पाण्यातील वाटीत नाण टाकणे असे लहान मोठे पंधरा स्टाॅल  लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारचा अनुभव घेता आला . कार्यक्रमाचे आयोजनासाठी शाळेचे मु.अ.श्री.प्रविण पिल्लेवार, स.शि.श्रीम.ऊर्मिला परभणकर , स्वयंपाकी पारुबाई व प्रकाश आत्राम यांनी परिश्रम घेतले व  कार्यक्रमास गावातील  नागरिक मोठ्या संख्येत येवून शोभा वाढविली .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)