नांदेडच्या ललित कला अकॅडमीत वारलीचित्र कार्यशाळा संपन्न

शालेयवृत्त सेवा
0




नांदेड  ( शालेय वृत्तसेवा ) :

एकीकडे कलेचे महत्व वाढत आहे मात्र शालेय स्तरावर  चित्रकलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांसह पालकांचाही कमी होत आहे.कलेचे शालेय जिवनातच नाही तर संपूर्ण आयुष्यात कलाही आनंद देणारी गोष्ट आहे.कलेचे महत्व लक्षात घेऊन नांदेडच्या ललित कला अकॅडमी येथे वारली चित्रकलेची कार्यशाळा घेण्यात आली.


भोकरच्या जिल्हा परिषद कन्या शाळेतील कलासक्त शिक्षक मिलिंद जाधव यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. वारली चित्रकलेचा इतिहास, वारली संस्कृती, वारली चित्रकलेचे बदलते स्वरूप आदी विषयांवर विद्यार्थ्यांना माहिती दिली. व वारली चित्रकलेबध्दल आसक्ती निर्माण केली.अकॅडमीचे संचालक चित्रकार नागेश सोनकांबळे यांनी वारलीचे प्रात्यक्षिक करून दाखविले अनेक विद्यार्थी या वर्कशॉपमध्ये सहभागी होऊन चित्रे रेखाटली.


याप्रसंगी अतुल येवतीकर विनोद राऊत आदी कलाशिक्षकांनीही विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिके करून घेतली. वाढते ताणतणाव, धावपळ, अभ्यासाचे ओझे काही अशी कमी करण्यासाठी नांदेड शहरात व परिसरात कला विषयक कार्यशाळा होणे गरजेचे वाटते. यासाठी कलाशिक्षक, कला रसीक, कला संस्था पुढाकार घ्याव्यात असे मत मिलिंद जाधव यांनी यावेळी  मांडले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)