अपघातापासून सुरक्षितेसाठी "उजवीकडून चाला " अभियानाचा शुभारंभ | Walk on Right

शालेयवृत्त सेवा
0

  " उजव्या बाजूने चाला "



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

रस्त्यावरील अपघातात पादचाऱ्यांचे वाढणारे निष्पाप बळी लक्षात घेऊन यावर उपाय योजनेसाठी आजवर अनेक उपक्रम राबविले. पूर्वीच्या प्रघात अनुसार आपण डाव्या बाजूनेच रस्त्यावर चालल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांची कल्पना न आल्याने गेलेले बळी अधिक आहेत. हे लक्षात घेऊन रस्त्यावर चालताना समोरून येणारे वाहने आपल्याला दिसावेत व त्यापासून स्वतःची सुरक्षा करता यावी या दृष्टीने नांदेड जिल्ह्यात " उजव्या बाजूने चाला " हे अभिनव मोहीम प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतले आहे.



या अभिनव मोहिमेचा शुभारंभ सहा जानेवारी 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कलामंदिर , एसपी ऑफिस चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर विद्यार्थी व मान्यवर उजव्या बाजूने चालून या अभियानाची सुरुवात करीत आहे.


त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय ते वजीराबाद पोलीस स्टेशन , महावीर चौक वजीराबाद रोड, एसपी ऑफिस चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरही विद्यार्थ्यांचा दुसरा गट उजव्या बाजूने चालून लोकापर्यंत हा संदेश पोहोचविणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी घ्यावं असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)