सर्वसामान्य कुटुंबातील "वसिमा शेख" झाली अमरावतीची उपजिल्हाधिकारी..

शालेयवृत्त सेवा
0

  

प्रचंड मेहनतीच्या जोरावर मिळविले यश !





नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

म्हणतात ना वाईट दिवसांचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस दिसत नसतात. अश्याच प्रकारच्या अनेक उपमा आपण जीवनात नेहमी कुठे ना कुठे पाहत असतोच, जीवनात संघर्ष केल्याशिवाय कोणालाही त्याचे ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात अपयशाचा सामना केल्याशिवाय यशप्राप्ती होणे कठीण आहे. म्हणून अपयश आणि संघर्ष या दोन गोष्टींचा सामना मनुष्याने आयुष्यात एक वेळ करावाच.


संघर्षाची झळ सोसावी लागतेच तेव्हाच यश पायाशी लोळण घालतं, याच वाक्याला सत्यात उतरविले महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याच्या जोशी सांघवी गावातील एका मुलीने. वसीमा शेख ही एक गरीब परिवारातील मुलगी आहे. त्यांचा एकूण परिवार आठ जणांचा आहे. या परिवाराचे आर्थिक आधार असणारे वडील आजरपणाने अस्वस्थ राहायचे म्हणून या आठ जणांच्या परिवाराला पोसण्याची जबाबदारी वसीम च्या आई वर आणि भावावर येऊन पडली, आई आणि भाऊ संपूर्ण परिवाराला पोसण्यासाठी काम करत. अशा परिस्थितीतही वशिमाने मिळविले यश. सर्वत्र तीचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)