जि. प. प्राथमिक शाळा उमरवाडी येथे "सावित्रीबाई फुले" जयंती "सावित्री उत्सव" म्हणून साजरा...

शालेयवृत्त सेवा
0





वाशीम (शालेय वृत्तसेवा ) :

पंचायत समिती मालेगांव येथील जि. प. प्रा. शाळा उमरवाडी येथे दिनांक ०३जानेवारी २०२३ रोजी सावित्रीबाई फुले जयंती " सावित्री उत्सव" म्हणून साजरा करण्यात आला..

सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री साहेबराव राठोड सर यांनी सावित्री माईंच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच शाळेतील सर्व शिक्षक व काही विद्यार्थी यांनी सुध्दा प्रतिमेचे पूजन करून सावित्री माईंना अभिवादन केले.

   त्यानंतर शाळेचे सह. शिक्षक श्री संघपाल सोनोने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की.... 

    घडलो नसतो मी.....

जर शिकली नसती माझी माय...

जर नसत्या सावित्रीबाई तर..

कशी शिकली असती माझी माय..

  या ओळीने सुरूवात करून सावित्री बाईंच्या जिवनपटावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर स. शि. श्री दिनेश घुगे सर व मनकर्ना शिंदे मॅडम यांनी सुध्दा मोलाचे मार्गदर्शन केले.

 

   अध्यक्षीय समारोपात शाळेचे मु. अ. श्री राठोड सर यांनी अतुलनीय मार्गदर्शन केले ते म्हणाले...

      ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही..

      बुध्दी असुनही चालत नाही, त्यास मानव म्हणावे का?

असा प्रश्न करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. स्री ला शिकु द्या, विचार करू द्या, कारण शिक्षणानेच मनुष्यत्व येते व पशुत्व हटते.




सावित्री च्या लेकीचा असाही सन्मान :

    

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीच्या लेकीचा सन्मान करण्यासाठी बालिका दिन म्हणून शाळेतील इयत्ता ७ व्या वर्गातील विद्यार्थीनी कु. भाग्यश्री रघुनाथ ठोंबरे हिला एक दिवसाची मुख्याध्यापिका बनवले व मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर बसवले तसेच कु. प्रतिक्षा चोंडकर, मुक्ता पांडे, कोमल शेळके, प्रिती धंदरे, वैष्णवी झळके, अश्विनी पांडे, प्रतिक्षा ठाकरे, दिपाली देवकर, ईत्यादी मुलींनी सावित्रीबाईंची वेषभूषा केली व स्वयंशासन दिन म्हणून शाळेचे कामकाज पाहिले. मार्गदर्शन श्री साहेबराव राठोड सर, संघपाल सोनोने सर, दिनेश घुगे सर, मनकर्ना शिंदे मॅडम यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)