तंबाखूमुक्त शाळा अभियानाच्या जनजागृती पोस्टरचे अनावरण

शालेयवृत्त सेवा
0

वेदिका गिरी, सोनाक्षी भोंग, चैतन्य ढेपे, संस्कृती जाधव या मुलींचा बाल परिषदेत सहभाग



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

मारतळा येथील  जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मागील अनेक वर्षापासून तंबाखूमुक्त शाळा म्हणून परिचित आहे  याचाच एक भाग म्हणून सलाम मुंबई फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य शासन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल परिषदेमध्ये शाळेतील चार विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.


वेदिका गिरी सोनाक्षी भोंग, चैतन्य ढेपे, संस्कृती जाधव  या मुलींचा समावेश आहे. सदरील बाल परिषद 3 फेब्रुवारी 2023 रोजी ऑनलाइन पद्धतीने  संपन्न होणार असून सदरेल विद्यार्थ्यांना वेगवेगळे कृती कार्यक्रम या तारखेपर्यंत पूर्ण करावयाचे आहेत  याचाच एक भाग म्हणून नुकतेच जनजागृती चे पोस्टर उपलब्ध झाले  सदरील पोस्टरवर  तंबाखू मुळे होणारे आजार, तंबाखू सोडल्याने होणारे फायदे आदी बाबतची असून  या पोस्टरच्या अनावरण   केंद्राचे केंद्रप्रमुख टी पी पाटील  व केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापकांचे  हस्ते करण्यात आले.


वर्ग पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी  पोस्टरच्या माध्यमातून तंबाखूमुक्त कुटुंब, शाळा, गाव, महाराष्ट्र  कशा पद्धतीने करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवले  शेवटी तंबाखूमुक्त जीवनाची शपथ घेण्यात आली सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी   उपक्रमशील शिक्षक रवी ढगे परिश्रम घेत आहेत यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव मुगावे, आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)