सोरापाडा येथील जिल्हा परिषद शाळेत हिमोग्लोबिन चा कॅम्प यशस्वीपणे संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

डॉ. विनायक वळवी व डॉ. के. के. पाडवी यांनी केली तपासणी




 

नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिकादिन यांच्या निमित्ताने सप्ताहातर्गत हिमोग्लोबीन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन अक्कलकुवा मराठी केंद्राच्या केंद्रप्रमुख नम्रता शेवाळे यांनी केले.


या कॅम्प मध्ये जमलेल्या विध्यार्थी व महिलांना विविध आरोग्यविषयक माहिती ब्रिटिश अंकुशविहिर व सोरापाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. विनायक वळवी व डॉ. के. के. पाडवी यांनी माहिती दिली.  या कॅम्प मध्ये जवळपास 60 महिलांनी सहभाग नोंदवला व रक्त तपासणी करून घेतली. या कॅम्प मध्ये केंद्रातील शिक्षिका उषा वळवी, वैशाली कोकणी, रत्नमाला माळी, कमलाबाई वसावे, गीता माळी, मनिषा बोरसे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रंजना पाडवी या सह मनिषा जाधव, अश्विनी शेंडगे, पद्मा केंद्रे, ज्योती कांदे यांनी सुद्धा सहभाग घेतला.


शाळेच्या वतीने कॅम्प मधील डॉ. व आशाताई यांचा सत्कार करण्यात आला. उपस्तितांना अल्पोपहार व चहा देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका कविता देसले, वर्षा पाटील, आशाताई रत्नाबाई काळे, राजश्री मराठे, ललिता तडवी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कालुसिंग वळवी यांनी केले तर उपस्थित मान्यवर यांचे आभार अंगद शेंडगे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)