शिरूर जिल्हा परिषद शाळेत बालिका दिन उत्साहात साजरा

शालेयवृत्त सेवा
0

 





नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जि.प.प्रा.शा.शिरूर शाळेत आज दिनांक  03/01/2023 वार मंगळवार रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त "बालिका दिन" साजरा करण्यात आला. व माता-पालक गटाची बैठक घेण्यात आली.


यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सोपान पाटील पडोळे यांनी भुषवले. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष श्री.महेबूब पठाण, उमरी तालुका समता दुत सौ.जयश्री गायकवाड, कवी अशोक हैबतकर यांची उपस्थिती लाभली. तर गटसाधन केंद्र उमरीचे विषय साधन व्यक्ती श्री. प्रमोद कुमार नंदेश्वर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरवातीस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थिती मान्यवरांचे पुष्पहार घालून सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे पदोन्नत मुख्याध्यापक आदरणीय श्री.एन.बी.पठाण सर यांनी केले.यावेळी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थीनी सावित्रीबाई फुले यांची वेषभूषा करून कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. समता दुत सौ.जयश्री गायकवाड यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचरीत्रावर प्रकाश टाकला व मुलगा-मुलगी समान असून आपण यात भेदभाव करणे गैर तसेच बेकायदेशीर आहे हे बिशद केले.


कवी अशोक हैबतकर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारीत तीन स्वरचित कविता सादर करून प्रबोधन केले. आदरणीय श्री.प्रमोद नंदेश्वर सर यांनी माता-पालक गटांना यथोचित मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांसह माता-पालकांचे विविध कृतिशील खेळ घेत चैतन्यमय वातावरण निर्माण केले.श्री.नंदेश्वर सर यांनी शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतलेल्या कु.धम्मदिक्षा बिरदे या विद्यार्थिनीस मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.


श्री.नंदेश्वर सर,अंगणवाडीताई श्रीमती इंदूताई यांनी अतिशय सुरेल आवाजात गीत सादर केले. शाळेत इयत्ता पहिली ते सातवीतील अनेक विद्यार्थ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचरीत्रावर भाषण केले तसेच सुंदर व सुरेख अशी छान छान गीते सादर केली.


आदरणीय रामचंद्र मोरे सर यांनी सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील प्लेगच्या साथीच्या वेळी केलेले अतुलनीय मदत कार्य याविषयावर मनोगत व्यक्त केले तर सौ. एस.पी.व्यवहारे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्यासह त्यांची प्रतिभासंपन्न कवयित्री म्हणून असलेली वेगळी ओळख करून दिली. शाळेतील जेष्ठ शिक्षक श्री.एस.एन.इंजेवाड सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तर श्री प्रताप भिसे सर यांनी आभार प्रदर्शन केले.


जेष्ठ शिक्षक आदरणीय श्री.एन.एम.कांबळे सरांच्या नेतृत्वात व नियोजनानुसार आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास समिती पदाधिकारी, मान्यवर, माता-पालक,विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)