आदर्श टिकवून ठेवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे-शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर

शालेयवृत्त सेवा
0

 

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास उत्साही प्रतिसाद




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना योग्य वयात दिशा देणे आवश्यक असते. विविध प्रयोगांच्यासोबतच या विज्ञान प्रदर्शनात साकारलेले वैज्ञानिकांच्या प्रतिमांचे दालन अभिनंदनीय असून हे आदर्श टिकवून ठेवण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले. 


शेलगाव (ता. अर्धापूर) येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी,  संस्थेचे अध्यक्ष सतीश देशमुख, श्रीकृष्ण फटाले, विज्ञान तज्ज्ञ प्रा. लक्ष्मण शिंदे, प्रा. मुनेश्वर, मुख्याध्यापक विठ्ठल चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी लोकदाजी गोडबोले, निजाम शेख, गजानन सोनटक्के, केंद्रप्रमुख विनोद देशमुख, विकास चव्हाण, आनंद मुदखेडे, रामेश्वर आळंदे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


श्री दिग्रसकर पुढे म्हणाले, अर्धापूर तालुक्याने या विज्ञान प्रदर्शनात विज्ञान ध्वज फडकवून नव्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. जिल्हाभर एक विज्ञान ध्वज निश्चित करण्यासाठी लवकरच जिल्ह्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात येईल. विज्ञान प्रदर्शनाचे अत्यंत नेटके आयोजन केल्याबद्दल त्यांनी गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापक यांचे अभिनंदन केले.


विज्ञान प्रदर्शनास अभूतपूर्व असा उत्स्फूर्त प्रतिसाद देत तालुक्यातील शाळांनी सहभाग नोंदविला.  इयत्ता ९वी ते १२ वी गटातून १६ प्रयोग सहभागी झाले. तर  इयत्ता ६वी ते ८वी गटातून ४७ प्रयोग सहभागी झाले होते.  विद्यार्थ्यांनी प्रयोगाची मांडणी करून आत्मविश्वासाने प्रयोगाचे सादरीकरण केले. 


विजेते याप्रमाणे आहेत. .

९ते १२ या गट- 

प्रथम क्रमांक- संत परबत महाराज हायस्कूल मालेगाव 

द्वितीय क्रमांक -राजाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पार्डी 

तृतीय क्रमांक-जिल्हा परिषद हायस्कूल, लोणी

        

इयत्ता 6 ते ८वी गट 

प्रथम क्रमांक -जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कामठा 

द्वितीय क्रमांक -श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय शेलगाव 

तृतीय क्रमांक - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिग्रस.


विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन करण्यात परिश्रम घेणारे मुख्याध्यापक श्री विठ्ठल चव्हाण, विषयतज्ञ अंकुश वारे, श्रीधर केसराळे, सचिन खिल्लारे, रज्जाक शेख, वानखेडे आर सी, डाकोरे एम.बी, शिंदे बी. बी, वाघमारे आर. के, कवळे के. ई, पंतगे ए. पी, कल्याणकर, बी. एस.यांच्यासह आत्मविश्वासाने प्रयोगाचे सादरीकरण करणारे यशवंत विद्यार्थी व मार्गदर्शन करणारे विज्ञानाचे शिक्षक यांचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)