कोण होणार भावी अधिकारी .. सरोवर शिक्षण मंडळ संस्थेमध्ये अनोखा उपक्रम !

शालेयवृत्त सेवा
0




सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :

100 फुटी परिसरातील सरोवर शिक्षण मंडळ या संस्थेमधील त्रिभाषेचे  मराठी, उर्दू  व इंग्रजी असणारे प्रत्येक   माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या अंगी भावी पिढी चांगली, सुशिक्षित होण्यासाठी व त्यांच्या ज्ञानाचे समृद्धीकरण होण्यासाठी भावी तरुण पिढी निर्माण होण्यासाठी सामान्य ज्ञान व अभ्यासक्रम या दोघांची सांगड घालून इयत्ता नुसार प्रश्नमंजुषा निर्मिती करून ती विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देण्यात आले . 


पंधरा दिवसाच्या कालावधीनंतर विद्यार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा इयत्ता नुसार घेण्यात आली व प्रत्येक तुकडीतून तीन क्रमांक काढून त्यांचे पुन्हा चार गट करून त्यानुसार पुन्हा एकदा प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन तीन क्रमांक काढण्यात आले. सदर स्पर्धेचे आयोजक  संस्थेचे सचिव माननीय श्री सरवर मुल्ला सर यांनी केले होते व यशस्वी प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षीस ही देण्यात येणार आहे. 


सदर प्रश्न मंजुषासाठी संस्थेचे संस्थापक माननीय हाजी मुनिरुद्दीन मुल्ला जी, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री एफ एम अकिवाटे सर , मुख्याध्यापक माननीय सौ शहनाज मुल्ला,सौ. शाहीन नदाफ व सर्व शिक्षकांचे सहभाग व मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)