नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
गोविंदेश्वर प्राथमिक शाळा नांदेड या शाळेच्या इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यानी नांदेड नागपूर हायवे वर असलेले वारंगा जिल्हा हिंगोली येथे भवानी माता मंदिर तसेच निसर्गरम्य पर्यटन स्थळ येथे विद्यार्थ्यानी शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला. रविवारी सुटीच्या दिवशी काढलेल्या या सहलीत विद्यार्थ्यानी मनमोकळेपणे खेळण्याचा आनंद घेतला तसेच या बरोबर येथील स्थळांची माहिती देखील विद्यार्थ्याना सांगण्यात आली.
या सहलीत विद्यार्थ्यानी वनभोजनचा देखील आनंद घेतला. या सहलीचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक सचिन दिग्रसकर यांनी केले. तसेच माधव नामवाड, दिगंबर कल्याणकर, सूर्यकांत जाधव संध्या सिंदगीकर, शोभा किडे सुग्रीव मोरे, बालाजी गायकवाड, सीमा दिग्रसकर सर्व शिक्षकांनी सहलीसाठी विद्यार्थ्यांची काळजीपूर्वक सोय करण्यासाठी सहकार्य केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .