रंगकर्मी प्रतिष्ठान उदगीरच्या रंगभरण चित्रकला निबंध स्पर्धेला चार हजार विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग ..

शालेयवृत्त सेवा
0

 मारोती भोसले या उपक्रमशील शिक्षकाने केले होते आयोजन !




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :    

      विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनाबरोबरच कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीर जिल्हा लातूर यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय रंगभरण चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेचे हे सलग सातवे वर्ष आहे. ज्यावेळी प्रथमच नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः  किनवट आदिवासी बहुल भागामध्ये सदर स्पर्धेला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला असून किनवट व माहूर तालुक्यातून जिल्हा परिषद,प्राथमिक माध्यमिक खाजगी अनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमाच्या एकूण 70 ते 80 शाळा मधून एकूण 3000ते 4000 विद्यार्थ्यांनी या राज्यस्तरीय रंगभरण चित्रकला निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे.


           सदर स्पर्धा ह्या शाळेतच व शाळेच्या वेळेनुसार घ्यावयाच्या होत्या,स्पर्धेसाठी लागणारा कागद हा संयोजकाकडून पुरविण्यात आला,सदर रंगभरण चित्रकला व निबंध या प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम 4001, द्वितीय 3001,तृतीय 2001बक्षीस तर उत्तेजनार्थ 100 घड्याळी देण्यात येणार आहेत.सदर स्पर्धेचा भव्यदिव्य बक्षीस वितरण सोहळा 29 जानेवारी 2023 रोजी उदगीर जि.लातूर येथे मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.बिभीषण मद्देवाड,उपाध्यक्ष मारोती भोसले यांनी सांगितले.


        या राज्यस्तरीय रंगभरण चित्रकला व निबंध स्पर्धेसाठी किनवट तालुक्यातील सरस्वती प्राथमिक विद्यालय,महात्मा ज्योतिबा फुले  विद्यालय,(प्राथमिक व माध्यमिक)गोकुंदा, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय घोटी,रतनाबाई राठोड विद्यालय गोकुंदा,सुमितीबाई मुलींचे माध्य.हायस्कूल सुभाष नगर किनवट,संत सखाराम विद्यालय राजगडतांडा, मातोश्री कमलाबाई माध्यमिक विद्यालय सुभाष नगर, महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक विद्यालय सुभाषनगर,खापरे माध्यमिक विद्यालय, शिवबाबा प्राथमिक निवासी आश्रम शाळा चिखली बु!!, इंदिरा गांधी माध्य.विद्यालय गोकुंदा, पोदार इंग्लिश मीडियम स्कूल  कोठारी,शांती निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल गोकुंदा, ईरा इंग्लिश मीडियम स्कूल गोकुंदा, मातोश्री कमलाबाई ठमके इंग्लिश मीडियम स्कूल कोठारी, जिल्हा परिषदेच्या शाळेमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजगडतांडा, जिप बेंदीतांडा,जिप गणेशपुर(जुने),जिप गणेशपुर(रोड), जिल्हा परिषद मांडवी हायस्कूल  जिल्हा परिषद पारडी हायस्कूल, जिल्हा परिषद केंद्र शाळा मालेगाव (व)जिल्हा परिषद केंद्रशाळा खंबाळा या शाळेनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवून  सदर स्पर्धेमध्ये भाग घेतला घेतला.


            ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी किनवट तालुक्याचे कार्यतत्पर,कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी पंचायत समिती शिक्षण विभागाकडून सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासंबंधीचे पत्र काढून मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.तसेच सहभागी शाळेचे संस्थाचालक शाळेचे मुख्याध्यापक, शाळेतील शिक्षक,कलाशिक्षक त्याचबरोबर तालुक्यातील शिक्षक मित्रपरिवार यांनी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)