गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांच्या हस्ते झाले उदघाटन ..
नंदूरबार ( गोपाल गावित ) :
तळोदा तालुक्यातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा नर्मदानगर येथे राजविहीर केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तळोदा पंचायत समिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर, प्रमुख पाहुणे शिक्षण विस्तार अधिकारी वंसत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, एखादी क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खेळाडूंबरोबरच त्यांच्या मैदानावरील कामगिरीमध्ये मोलाची कामगिरी बजावणाऱ्या क्रीडा व्यवस्थापनाचे योगदानसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी वसंत पाटील यांनी सांगितले की, जीवनातील प्रत्येक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी उत्तम आरोग्य आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने शिक्षणा एवढेच व्यायाम आणि खेळांना महत्व दिले पाहिजे. समाजाचे आरोग्य सुदृढ रहा असेही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच केंद्रप्रमुख डॉ. जयश्री बागले यांनी प्रास्ताविक भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्पर्धा, मैदानी खेळ आवश्यक आहेत असे सांगितले.
प्रविण जाधव यांनी स्पर्धेची नियमावली सांगितली अंगी स्पर्धेत कबड्डी , खोखो , धावणे , गोणपाट उडी , निंबू - चमचा शर्यत , लांबउडी व संगितसूर्ची घेण्यात आली . एकुण 289 स्पर्धकांनी भाग विजयी संघाना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. क्रिडा स्पर्धा यशस्वितेसाठी श्री घटी सर, आदम सर, श्री.मेरे सर ,श्री.पाडवी सर, श्री.भगरे सर , तडवी सर, श्री.घागे सर इतर सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकांचे सहकार्य लाभले .
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .