अपंग युनिट समायोजित प्राथमिक शिक्षकांना वेतन अदा, प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुरावाला यश

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

केंद्रीय पुरस्कृत अपंग एकात्मिक योजनेतील समायोजनाद्वारे प्राथमिक शिक्षकांची मा. उपसचिव शालेय शिक्षण शिक्षण संचालक नियुक्ती आदेश व उमेदवारांचे शैक्षणिक अहर्ता, छायांकित कागदपत्रांचे आधारे नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नियुक्ती आदेश देण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांवर सामावून घेण्यात आले होते. 


महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद सेवेत लागलेल्या अपंग युनिट अंतर्गत समावेशन केलेल्या प्राथमिक शिक्षकांना नंदुरबार जिल्हा वगळता इतर जिल्हा परिषदेकडून वेतन अदा  करण्यात  होते. 41 प्राथमिक शिक्षक विनावेतन काम करत असल्याने शिक्षकांवर कुटुंबाची उपासमारीची वेळ होती. शिक्षकांच्या प्राप्त तक्रारीनंतर महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी निवेदनाद्वारे नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार मा.डॉ. हिनाताई गावित, पालकमंत्री तथा आदिवासी विकास राज्यमंत्री  मा.ना.डॉ. विजयकुमार गावित, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथराव शिंदे, माजी शालेय शिक्षण राज्यमंत्री मा. ओमप्रकाश बच्चुभाऊ कडू , शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक, अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावित, जि. प. उपाध्यक्ष सुहासदादा नाईक, शिक्षण सभापती गणेशदादा पराडके, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार, मुख्य लेखा व वित्त आधिकारी अतुल गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांच्याकडे प्रहार 


शिक्षक संघटनेचे निवेदन सादर करण्यात आले होते. प्राथमिक शिक्षण संचनालय पुणे या कार्यालयातील अपंग एकात्मिक शिक्षण योजना समन्वयक संचालक प्राथमिक शिक्षण यांचे तसेच शालेय शिक्षण विभाग व ग्रामविकास विभाग या मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी अवर सचिव व उपसचिव दर्जाचे अधिकारी यांचे विशेष शिक्षकांना जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळांमधील रिक्त पदावर सामावून घेण्याची कार्यवाही बाबत पत्रव्यवहार झालेला होता. जिल्हा परिषद स्तरावर अपंग युनिटमधील विशेष शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त पदावर सामावून पाच वर्ष झालेली होती तरी देखील वेतनापासून वंचित असणाऱ्या अपंग युनिट अंतर्गत 41 शिक्षक नियमित कार्यरत असून मागील पाच वर्षापासून वेतन बंद करण्यात आले होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली होती. 


महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष विकास घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेमार्फत वाडी, वस्ती,पाड्यातील कार्यरत असणाऱ्या  विशेष शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी शासनास पाठपुरावा करण्यात आला होता. प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची दखल घेऊन अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील विशेष शिक्षकांना प्रशासनाने व शिक्षण विभागाने विशेष शिक्षकांच्या वेतनासाठी रक्कम खात्यावर वेतन अदा करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी प्रशासनाचे व शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले आहे. 


यावेळी उत्तर देताना गोपाल गावीत यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकांची अनेक प्रश्न जिल्हास्तरावर प्रलंबित आहेत. हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल . तसेच आगामी काळात संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात प्रहार  शिक्षक संघटनेचा ताकदीने विस्तार केला जाईल अशी ग्वाही दिली. गोपाल गावीत नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटनेच्या कार्याबद्दल जिल्ह्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)