पेठवडजच्या परफेक्ट इंग्लीश स्कूलचा स्काॅलरशिपचा निकाल पुन्हा एकदा जिल्ह्यात परफेक्टच

शालेयवृत्त सेवा
0

 ४३ पैकी ३७ शिष्यवृत्ती धारक !




नांदेड ( शरद जोगदंड ) :

कंधार तालुक्यातील पेठवडज या  ग्रामीण भागात असलेल्या परफेक्ट इंग्लीश स्कूलचा स्काॅलरशिपचा निकाल 100% लागला असून पुन्हा एकदा जिल्ह्यात ही शाळा नावाप्रमाणे परफेक्ट ठरली आहे.


      या वर्षी इयत्ता पाचवी मधून  43 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यात सर्वच्या सर्व 43 विद्यार्थी पात्र झाले. तर 37 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक गुणवत्ता यादीत आले आहेत, तसेच आठव्या वर्गाच्या 11 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी सर्व 11 विद्यार्थी पात्र होऊन त्यातील सर्व 11 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक  झाले आहेत. या वर्षी पाचवीचे 37 व आठवीचे 11 असे एकूण 48 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत.


 आतापर्यंत शिष्यवृत्ती धारक गुणवत्ता यादीत 142 व या वर्षी 48 असे एकूण 190 विद्यार्थी झळकले आहेत. तसेच आतापर्यंत नवोदय विद्यालयासाठी 66 विद्यार्थी व सातारा सैनिक स्कूल व चंद्रपूर सैनिक स्कूल साठी 21 पात्र झाले आहेत.  यावर्षी ही पाचवीच्या वर्गातील नांदेड जिल्ह्यात   शिष्यवृत्ती धारक झालेल्या विद्यार्थीपैकी  37 विद्यार्थी परफेक्ट इंग्लीश स्कूलचे विद्यार्थी तर आठवी वर्गातील तालुक्यात 28 विद्यार्थीपैकी 11 विद्यार्थी परफेक्ट इंग्लीश स्कूलचेच आहेत.


 या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री गिरधारी जी केंद्रे सर आणि संस्थेचे सचिव श्री गोविंद केंद्रे, कंधारचे गटशिक्षणाधिकारी, पेठवडज बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी संजय येरमे सर, मुखेडचे गटशिक्षणाधिकारी कैलास व्होनधरणे सर, लोहाचे गटशिक्षणाधिकारी सतिश व्यवहारे सर, विस्तार अधिकारी पाटिल सर, केन्द्र प्रमुख मोरे सर, विरभद्र जाधव,परफेक्ट इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुराधा पवार (हिवराळे), रेखाताई पोतदार, मुरलीप्रसाद वैद्य, अशोक तेंलग, राहुल किनवाड, सुनिल पाटील, चिटकुलवार एस डी, लोहबंदे सर, राचवाड कोमल, सुर्यवंशी सर, आगलावे मिस, लक्ष्मी मीस, आगलावे सर, पवार सर, बेतेवाड मॅडम, पारडे वैशाली, गजभारे मिस, शिन्दे भगवान सर, राठोड सर, नवघरे सर, पवळे सर, कोमल हिवराळे, दिक्षीत मिस, तेलंग मॅडम, सोनकांबळे मॅडम, वैद्य मिस, सोनाली करेवाड, कपाळे सर, कुठेकर मॅडम, पाटिल मॅडम, शेख नाजीया मिस, यरावार मीस, इंगोले मिस, लश्करे सर, आरती किनवाड, पवळे सर यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या यशाबद्दल पालक, विद्यार्थी, शिक्षक व संस्थेचे सचिव गोविंद केंद्रे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)