नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा ता.जि. नांदेड येघील शाळेची निसर्ग सहल पाताळेश्वर मंदिर निळा येथे काढण्यात आली. पहिली ते सातवी मधील एकूण 210 विदर्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शाळा ते पाताळेश्वर मंदिर आणि मंदिर ते शाळा पर्यंत चा प्रवास RTO च्या नवीन नियमावली नुसार रस्त्याच्या उजव्या बाजूने चालण्याच्या नियमाचे प्रात्यक्षिक ही देण्यात आले.शिस्तीत विदयार्थी चालत होते.त्याच बरोबर आपला डब्बा, पाण्याची बॉटल या ओझ्यासह आपली वस्तू आपली जबाबदारी आहे याची ही जाणीव विध्यर्थ्याना प्रात्यक्षिकातून करून देण्यात आली. पाताळेश्वर मंदीर परिसरात सर्व विदयार्थी आपल्या आपल्या वर्गाच्या गटात बसून गाणी,गोष्टी, भेंड्या हावभाव, घेत होते तर सर्व वर्गशिक्षक त्यांना वेगवेगळ्या सूचना देत होते.
स्थानिक परिसर आणि त्या परिसरात घेण्यात येणाऱ्या पिकांची माहिती,खरीप आणि रब्बी पिके,या बद्दल गी माहिती देण्यात आली. त्या नंतर सामूहिक भोजन घेण्यात आले.प्रत्येक विध्यर्थ्यांच्या डब्ब्यात असलेल्या भिन्न भिन्न पदार्थांचे निरीक्षण केले तर विविधतेत एकता दिसून आली.
सहलीच्या प्रमुख म्हणून श्रीमती पांडे मॅडम आणि सर्व टीम उत्साहाने आपले आपले कामकाज पर पाडत होते. सहलीत पोहरे सर, बेळगे सर,पांडे मॅडम,गंजेवार मॅडम,पाम्पटवार मॅडम, रत्नपारखी मॅडम,कर्णेवार मॅडम आणि मोखंडपल्ले मॅडम हे सर्व सहभागी होते.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .