नंदुरबार ( शालेय वृतसेवा ) :
धडगाव तालुक्यातील महाराष्ट्रातील शासनाची पहिली आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ येथे 2017 मध्ये स्थापन करण्यात आली महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या थंड हवेच्या ठिकाणी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळ ही नंदुरबार शहर मुख्यालय तीन वर्ष कार्यरत होती गेल्या दोन वर्षापासून तोरणमाळ येथील प्रशस्त वास्तुत स्थलांतरित झाली. तोरणमाळ परिसरातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या प्रवाहात कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी ही शाळा निश्चितच फलदायी ठरताना दिसून येत आहे.
नुकतेच या शाळेला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईचे राज्य प्रकल्प संचालक श्री कैलास पगारे शिक्षण उपसंचालक नाशिक डॉक्टर बी बी चव्हाण यांच्यासह एमपीएससीच्या उपसंचालक श्रीमती वैशाली वीर एम पी एस पी चे सल्लागार श्री सिद्धेश वाडकर, उपअभियंता श्री योगेश बोराडे, यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी भेट दिली शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा व वाद्यासह सर्व अधिकाऱ्यांचं स्वागत केलं तसेच उपस्थित अधिकाऱ्यांसमोर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून भावी शिक्षणाचा मनोदय व्यक्त केला सदर प्रसंगी माननीय सचिव महोदय यांनी शाळेच्या भौतिक गरजा शिक्षक कमतरता व इतर गरजांसाठी लवकरात लवकर पूर्णत्वास आणण्याबाबत आश्वासित केले. भविष्यवेधी शिक्षण विचारासाठी सदर शाळा संगणकीकृत करून आयसीटी लॅबसह विज्ञान प्रयोगशाळा क्रीडा सुविधा देण्याबाबत अधिकाऱ्यांनी आश्वासित केले निश्चितच भावी काळात या दुर्गम परिसरातील वाड्यावस्था वरील प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल यात शंका नाही.
सदर कार्यक्रमास नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण सभापती श्री गणेश पराडके ,डायट प्राचार्य डॉ जगराम भटकर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री मच्छिंद्र कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री सतीश चौधरी, वरिष्ठ अधिव्याख्याता श्री प्रवीण चव्हाण, श्री रमेश चौधरी, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, अधिव्याख्याता डॉ. संदीप मुळे, गटशिक्षणाधिकारी श्री राजेंद्र बच्छाव, यांच्यासह विस्तार अधिकारी श्री वाकोडे ,शामराव ईशी केंद्रप्रमुख श्री नरेंद्र महिरे, श्री चौधरी परिसरातील गुणवत्तापूर्ण काम करणारे शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुधीर पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी साठी सर्व शिक्षक व जिल्हा परिषद यंत्रणा यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .