विज्ञान प्रदर्शन इंदिरा इंटरनॅशनल स्कूल सहयोग कॅम्पस नांदेड....

शालेयवृत्त सेवा
0

  



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

नांदेड ग.शि.अ. कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते मार्गदर्शक आदरणीय रुस्तुमजी आडे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड यांच्या सूचनेनुसार इंदिरा इंटरनॅशनल स्कूल संयोग कॅम्पस नांदेड येथे नांदेड तालुक्यातील  सर्व बीट मधून भरभरून असा प्रतिसाद विज्ञान प्रदर्शनास दिसून आला. 


पर्यावरणावर इलेक्ट्रॉनिक... शेती विषयक.. शहराची बांधणी कशी असावी विविध प्रकारचे उपक्रम प्रोजेक्ट स्वरूपामध्ये नांदेड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनतीने तयार करून आणलेले दिसून आले आदरणीय साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शक पर भाषणात सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन केले या कामी विषय तज्ञ ढगे सर केंद्रप्रमुख धोपटे सर फाजगे सर सर्व केंद्रप्रमख कुलकर्णी सर बि डी जाधव सर सर्व विषयतज्ञ तसेच इंदिरा इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य वानखेडे सर यांनी अतिशय सुंदर नियोजन करून विज्ञान प्रदर्शन यशस्वीरित्या पूर्ण केले या प्रदर्शनात इतर शाळांच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा छान प्रकारे लाभ घेतला हेही दिसून आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)