विद्यार्थीनी सावित्रीमाईच्या वेषभूषेत अगदी नटून थटून आल्या..
नांदेड ( शरद जोगदंड ) :
शहरातील शिवाजी महाराज प्राथमिक शाळा मुखेड येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
बालिका दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विद्यार्थीनी सावित्रीमाई च्या वेषात अगदी नटून थटून आल्या होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. शिंदे एल.के तर प्रमुख पाहुणे सौ. शिवप्रेमा गोंड, श्री. सुरेश जमदाडे, जगदीश जोगदंड, मोहन अंदुरे, प्रभाकर जाधव हे उपस्थीत होते. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व सावित्रीमाई च्या वेषात आलेल्या सर्व विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
माया श्रीरामे व श्रद्धा डूमने या विद्यार्थिनींनी मी सावित्री बोलतेय या विषयावर स्वतःचे मनोगत व्यक्त केले तर सहशिक्षक सुरेश जमदाडे, मोहन अंदुरे, जगदीश जोगदंड, प्रभाकर जाधव, शिवप्रेमा गोंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी कु.माया श्रीरामे यांनी केले तर प्रास्ताविक जगदीश जोगदंड यांनी केले.
अध्यक्षीय समारोप करताना लक्ष्मीबाई शिंदे यांनी आपण फक्त सावित्री बनून आल्याने त्यांची जयंती साजरी होणार नाही तर त्यांचे विचार, त्यांची शिकवण आपण आपल्या मनात रुजवून त्याप्रमाणे वागले पाहिजे तेव्हाच खरी जयंती साजरी होईल. त्यांनी ज्याप्रमाणे मुलींच्या शिक्षणासाठी कशाचीही पर्वा न करता मुलींना शिकवण देण्याचे ध्येय मनात बाळगून अपार कष्ट केले. त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपले ध्येय उराशी बाळगून आपण त्यामध्ये यशस्वी झाले पाहिजे असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रभाकर जाधव यांनी मानले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .