नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिजामाता प्राथमिक शाळा मुगट येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी जिजामातेचे आणि बाल शिवाजीचे पात्र साकारून त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली तसेच लेझीम पथकामध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यांनी गावकऱ्यासमोर राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजींचे प्रात्यक्षिक उभे केले.
त्यामुळे गावकऱ्यांनी शाळेचे सचिव श्री विलासराव कल्याणकर, शाळेतील मुख्याध्यापक श्री देवठाणकर सर ,लेझीम पथकाची गाण्याच्या तालावर कृती करून घेणाऱ्या हातागळे मॅडम, सौ भोसले मॅडम, दरबस्तवार मॅडम, सौ जोशी मॅडम, सुजले गावकर मॅडम, श्री भोसले सर आणि विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केले.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .