सावित्रीमाईचा आदर्श ठेवून मुलिंनी प्रगती करावी - शाहीन बेग

शालेयवृत्त सेवा
0

 'बालिका दिन '  मोठ्या उत्साहात साजरा ..




नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट तालुक्यातील लोणी जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती 'बालिका दिन ' म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी आणि राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर उपस्थित होते.


उपक्रमशील शिक्षिका शाहिन बेग ह्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विशेषत: मुलींनी सावित्रीच्या  त्यागाची आठवण करून शिक्षण घ्यावं. पूर्वी महिलांना मुलींना शिक्षणाचे बंदी होती. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा काढून शिक्षणाचे दारे सर्वांना खुली केल्यामुळे आज सर्व महिला मोठ्या पदावर सन्मानाने जगत आहेत. शिकलं तरच अंधश्रद्धा आपल्यातून नष्ट होईल म्हणून शिक्षणाला महत्त्व द्यावे अशा आशयाचे विचार त्यांनी मांडले. 


सर्वप्रथम सावित्रीबाईच्या प्रतिमापूजनानंतर ज्योती कोसरे,   प्रांजल गुंजकर, पूर्वी धुर्वे, श्रृती गुंजकर या विद्यार्थीनी नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर ची गाणी सादर केली. त्यानंतर प्रांजल गुंजकर , पूर्वी धुर्वे, प्रतिक गुंजकर या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईच्या जीवन चरित्रावर भाषण केलीत.


यावेळी मुख्याध्यापिका वर्षा कुलकर्णी आणि रमेश मुनेश्वर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सावित्रीबाईच्या जीवन चरित्राची माहिती दिली. यावेळी सर्व विद्यार्थांनी शिकून अधिकारी होण्याचा ' संकल्प ' केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती गुंजकर या विद्यार्थिनीने केले तर आभार तेजश्री काळे या विद्यार्थिनीने मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)