लक्ष्मणराव कंधारे गुरुजीचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात

शालेयवृत्त सेवा
0


34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त






नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळणी केंद्र निळा तालुका जिल्हा नांदेड येथील शिक्षक श्री. लक्ष्मण रामा कंधारे सर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. शाळेच्या  व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा तथा निरोप समारंभ शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुरेशराव पाटील सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भुषवीले.या मंगलमय सोहळ्यासाठी गावचे सरपंच श्री वैजनाथ पाटील सूर्यवंशी , उपसरपंच घनश्याम सूर्यवंशी तसेच शालेय व्यवस्थापन  समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणुन नांदेड जिल्हा इंडीयन बहुन टीचर्स असोशियशन(इब्टा) संघटनेचे केंद्रीय जिल्हाध्यक्ष तथा नांदेड  जिल्हा शिक्षक सहकारी  पतसंस्थेचे विद्यमान संचालक श्री बालासाहेब लोणे सर , पंचायत समिती  किनवटच्या विस्तार अधिकारी श्रीमती शोभाताई भारती मॅडम , निळा बीटच्या  विद्यमान विस्तार अधिकारी श्रीमती लताताई कवठेकर मॅडम, निळा केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमान विश्वंभर धोपटे सर, निळा केंद्राचे प्रभारी केंद्र मुख्याध्यापक कैलास पोहरे सर तसेच सेवानिवृत्त उच्च श्रेणी  मुख्याध्यापक माननीय माधव जाधव सर , कंधारे सरांचे मित्र श्री.भागवतराव बनसोडे सर ,चंद्रकांत आडे सर  श्री.नागमपल्ले सर कंधारे सरांचे कुटुंबीय त्यांची आई, पत्नी ,मुले, मुलगी, निळा केंद्रांतर्गत येणारे सर्व मुख्याध्यापक , तसेच ज्ञानेश्वर विद्यालय तळणीचे मु.अ. श्री.साबळे सर आवर्जून उपस्थित होते.  


सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने  शुभेच्छा देताना मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात सर्व प्रमुखपाहुने , शाळेतील व केंद्रातील शिक्षक ,नातेवाईक व विद्यार्थी  यांचा सहभाग होता. प्रत्युत्तरदाखल आजचे सत्कारमूर्ती आदरणीय लक्ष्मणराव कंधारे सर यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीचा लेखाजोखा आपल्या मनोगतातुन मांडला त्यांच्या  34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेचा अनुभव आजच्या प्रसंगी उद्रृत केला .


कार्यक्रम च्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय आर.डी. गोवंदे सर , श्री.डी.डी.ढवळे सर श्रीमती अय्यंगार मॅडम, श्रीमती साखरे मॅडम ,सौ. शोभा अनमुलवार मॅडम, सौ. गयाबाई केंद्र मॅडम ,कुमारी स्मिता ढगे मॅडम या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेचे पदवीधर शिक्षक श्री डी.डी. ढवळे सर यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे आभार शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. शोभा अनमुलवार मॅडम यांनी मानले . सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)