जिजाऊ ज्ञानमंदिरात जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

शालेयवृत्त सेवा
0




नांदेड (शरद जोगदंड ) :
स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती मुखेड येथील जिजाऊ ज्ञानमंदिरात उत्साहात साजरी करण्यात आली.
     
              दि १२ रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव ' क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व युवा दिनाचे औचित्य साधून युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद
जयंती संयुक्त पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी एकशे छप्पन विद्यार्थ्यानी राजमाता जिजाऊ माँसाहेब , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , युवा प्रेरणास्तोत्र स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व कार्यावर प्रकाशझोत टाकला. काही विद्यार्थ्यांनी गीते तर काही विद्याथ्यांनी नाटिका सादर करून कार्यक्रमात चांगलीच जान भरली. भाषण करणाऱ्या सहभागी विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने सदरील कार्यक्रम सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात घ्यावा लागला. एकशे नऊ मुले मुली कुणी राजमाता जिजाऊ तर कुणी क्रांतीज्योती सावित्रीबाई तर मुले स्वामी विवेकानंदांच्या वेशभूषेत आले होते.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ज्ञानोबा जोगदंड मुख्याध्यापक जगदीप जोगदंड तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीसंत कैकाडी महाराज प्राथमिक शाळा बाऱ्हाळीचे सेवानिवृत शिक्षक पांचाळ सर तसेच माटरोल मॅडम पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुरटवाड मॅडम यांनी केले . जिजाऊ वंदना शितल मॅडम यांनी गायीले. स्वागतगीत सुमधूर स्वरात गाऊन सचिन सुर्यवंशी सर व विनिता चव्हाण या मुलीने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे बहारदार असे सुत्रसंचलन जोशी मॅडम यांनी केले. 
          
           कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जगदीप जोगदंड ,पर्यवेक्षक सुधाकर जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वर्गशिक्षक , शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी , पालक यांच्या सहकार्यामुळेच कार्यक्रम यशस्वी झाला . याबदल पालकांनी समाधान व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)