स्थानिक सुट्याबाबत महत्वाचे..
राज्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना स्थानिक
पातळीवर काही विशिष्ट दिवसांना सुट्या जाहीर केल्या जातात. या सुट्टया जाहीर करताना खालील बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.
- शाळेला सुट्टी जाहीर करताना सक्षम प्राधिकाऱ्याने सुटी जाहीर करणे आवश्यक आहे.
- शिक्षक दिन, शाळा प्रवेशोत्सव इ.सारखे महत्वपूर्ण कार्यक्रम सुरु असताना यामध्ये सुटीची बाधा येणारनाही, याची दक्षता घ्यावी.
- कोणत्याही व्यक्तिगत बाबींसाठी सुटी जाहीर केली जाणार नाही.
- विभागातील अन्य महत्वाचे दौरे, कार्यक्रम इ.च्या नियोजनास बाधा येणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.
वरील बाबीं विचारात घेऊन स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात यावी.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .