शेवडी बाजीराव केंद्राची शिक्षण परिषद संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



  
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ):
येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वतीने संचलित  जि. प. प्रा .शा. जवळा पु.  येथे शेवडी बा. या केंद्राची माहे डिसेंबर 2022 या महिन्याची शिक्षण परिषद जवळा दे. या शाळेने आयोजित केली होती. प्रस्तुत शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी सौ. जयश्री आठवले मॅडम ( प्राचार्य, डायट नांदेड) या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री चंद्रकांत धुमाळे सर (अधिव्याख्याता तथा संपर्कप्रमुख लोहा /डायट नांदेड ), डॉ. श्री. माणिक जाधव सर (अधिव्याख्याता डायट नांदेड), श्री .देशमुख सर (अधिव्याख्याता डायट नांदेड), श्रीमती .अंबलवाड मॅडम ( शि. वि . अ. बीट सुनेगाव) , श्री. नागोराव जाधव ( केंद्रप्रमुख शेवडी, बा.) , श्री .आनंदा नरवाडे (केंद्रीय मु. अ. शेवडी, बा . ), श्री. कालेवार सर (मु .अ. जि. प .हा. पेनुर), श्री यूक्रांत देशपांडे (मु. अ. दीनदयाळ मा.वि. बेटसांगवी ), श्री . मरशिवणे सर ( मु. अ. महेश विद्यालय शेवडी), श्री संतोष आंबुलगेकर ( जिल्हाध्यक्ष शिक्षक सेना), मुख्याध्यापक ढवळे जी. एस. आदींची उपस्थिती होती.

     
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आली. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या स्वागतानंतर विशेष स्वागतामध्ये श्री चंद्रकांत लामदाडे सर यांनी पोहण्याच्या शर्यतीत राज्यस्तरावर सोनेरी पदकाची व त्यांची कन्या गार्गी ही देखील राज्यस्तरावर सोनेरी पदकाच्या कमाई केल्याबद्दल तसेच वेदिका वानखेडे या विद्यार्थिनीने अडथळ्याच्या धावण्याच्या शर्यतीमध्ये जिल्हास्तरावर द्वितीय व राज्यस्तरावर धडक मारल्याबद्दल, व श्री संतोष आंबुलगेकर सर यांनी जिल्हा पतपेढीत घवघवीत विजय मिळवत संचालक झाल्याबद्दल उपरोक्त सर्वांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

        
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री.  गंगाधर ढवळे ( साहित्यिक /मु. अ. जवळा दे. ) यांनी कार्यक्रमाचा उद्देश व आयोजन रूपरेषा सांगितली. यानंतर वेदिका वानखेडे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्यावर प्रखर भाषण करून सर्वांना प्रभावित केले. श्री. धुमाळे सरांनी आपल्या भाषणात अध्ययन निष्पत्ती व त्यासाठी प्रयत्न करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे सूचित केले. तर डॉ.  माणिक जाधव सरांनी भाषा विषयातील येणाऱ्या संभाव्य अडचणीवर कशी मात करता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. श्री देशमुख सरांनी परिसर अभ्यासाचा सर्व्हे पूर्ण करण्यास तो सखल व पूरक मार्गदर्शन केले. श्री नागोराव जाधव सरांनी सर्व्हेक्षणाबाबत सर्वसाधारण सूचना देऊन काही प्रशासकीय सूचना उपस्थितांना दिल्या. सकाळ सत्राच्या अध्यक्षीय समारोपीय भाषणात डायट चा प्राचार्य तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. आठवले मॅडम यांनी अध्ययन निष्पत्ती शंभर टक्के साध्य करण्यासाठी सूक्ष्म नियोजन व विचार मंथनाची गरज असल्याचे सांगताना श्री लामदाडे सरांचा आदर्श इतर शिक्षक व विद्यार्थी यांनी घ्यावा असे नमूद केले. 


    
द्वितीय सत्राची सुरुवात मराठी विषयांचे प्रत्यक्ष कार्यवाही व अंमलबजावणी करून सर्व्हे यशस्वी करण्याचे प्रशिक्षण सुलभक श्री कैलासे सरांनी दिले. परिसर अभ्यास व गणित सर्व्हे विषयी सखोल व उदाहरणासह श्री मालू जाधव यांनी प्रशिक्षित केले. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील मुद्दे व इंग्रजी विषयाचे सर्व्हेक्षण याविषयी अभ्यासपूर्वक माहिती उपस्थितांना राठोड मॅडम यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भारती राठोड मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री .मुळे सर / श्री .अशोक राऊत सर यांनी केले सुरुची भोजनांची व्यवस्था जवळा दे . या शाळेच्या मु. अ.  व शिक्षकांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)