क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास - जि. प. सदस्या भारतीताई भिल

शालेयवृत्त सेवा
0

 

प्रकाशा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न       



नंदूरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

शहादा पंचायत समितीतिल प्रकाशा केंद्र शाळेत केंद्रस्तरीय शालेय क्रीडा महोत्सव अर्थात चला खेळ खेळूया उत्स्फूर्तपणे संपन्न झाला. चला खेळूया महोत्सवाचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषद सदस्य भारतीताई भील, पंचायत समिती सभापती विरसिंगदादा ठाकरे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. 


यावेळी पंचायत समिती सदस्य जंगदादा भिल, मच्छीमार सोसायटी जिल्हाध्यक्ष पंडित धनराळे, सामाजिक कार्यकर्ता नंदूभाई पाटील, सामाजिक कार्यकर्ता अरुण भील, पंचायत समिती शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी धीरसिंग टी. वळवी, प्रकाश बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी युवराज बी. मोरे, प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर, केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, लोकमत चे वार्ताहर नरेंद्र गुरव, देशदूतचे वार्ताहर पूनमचंद सर, वैजाली शाळेचे पदोन्नती मुख्याध्यापक सुदाम पाटील, कन्या शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक जावेद मंसूरी, शामनगर मुख्याध्यापक आशा भोई, रामनगर मुख्याध्यापक महेंद्र शिंपी, डामरखेडा मुख्याध्यापक विश्वास माळी, करजई शाळेचे मुख्याध्यापक संतोष कुवर, बुपकरी शाळेचे मुख्याध्यापक किशोर महाले, नांदर्डे शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र सूर्यवंशी, करणखेडा शाळेचे मुख्याध्यापक बापू पाटील तसेच केंद्रातील बंधू भगिनी व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


सभापती विरसिंगदादा ठाकरे यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले, यशापयशाचा विचार न करता अधिकाधिक विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये खिलाडूवृत्तीने सहभागी व्हावे.स्वतः जिंकण्यासाठी खेळायचे असते, दुसर्‍याला हरवण्यासाठी नाही खेळायचे, अनेक नामांकित खेळाडूंची नावे सांगून खेळात सातत्य टिकविले तर उज्ज्वल यश प्राप्त करता येते. त्याद्वारे शाळेचे, आपले, गावाचे नाव रोशन करता येते. खेळातून आपले आरोग्य सुदृढ राहते, निरोगी राहते. शालेय जीवनात कवायती करतानाची आज आठवण झाली. सर्व खेळाडूंना मनःपूर्वक शुभेच्छा देताना उत्तम खेळा, असे मार्गदर्शन केले. क्रीडा व शालेय जीवनामध्ये योगाभ्यासालाही अन्यन्न साधारण  महत्त्व आहे असे शाळेतील विद्यार्थ्यांना पटवून द्यावे असेही मत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी मत व्यक्त केले. 


गटशिक्षणाधिकारी धिरसिंग वळवी यांनी मनोगतातून सांगितले की, यशापयशाचा विचार न करता अधिकाधिक विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये खिलाडूवृत्तीने सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर खेळाचे व नियमितपणे व्यायाम करण्याचे आवाहन केले. केंद्रातील 11 शाळेतील 300 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. लहानगट लिंबू चमचा, बेडूक उड्या मारणे, 100 मीटर धावणे, गोणपाट शर्यत, संगीत खुर्ची, सांघिक खेळ मुले-मुली मोठा गट  खो-खो, कबड्डी, लंगडी या स्पर्धा घेण्यात आल्या.  केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी प्रमुख पाहुणे यांना गुलाबपुष्प, शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. 


कार्यक्रमाच्या सुरुवातीला  प्रकाशा कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी लेझीम ढोल पथक सादर करून कार्यक्रमात प्रसन्न वातावरण निर्माण केले. पंचायत समिती शहादा सभापती विरसिंगदादा ठाकरे यांच्या हस्ते  विज्ञान प्रदर्शन तालुकास्तरीय अध्यापन शैक्षणिक साहित्य निर्मिती  प्रथम क्रमांक वैजाली जि. प. शाळेचे शिक्षक गोपाल गावित यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रकाशा गावाचे सरपंच राजनंदिनीताई भिल यांच्या हस्ते ढाल, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख राजेंद्र धनगर यांनी केले. सूत्रसंचालन दर्पण भामरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार संगीता राणे यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)