पिंपळखुंटा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 


 

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुंटा येथे केंद्र शाळेत क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समिती सदस्य श्री. अशोकदादा राऊत, जिल्हा परिषद नंदुरबार महिला व बालकल्याण समिती माजी सभापती निर्मलाताई राऊत, जिल्हा परिषद नंदुरबार माजी सदस्य सितारामदादा राऊत, पंचायत समिती सदस्य आपसिंगदादा, शिक्षण विस्तार अधिकारी आरती शिंपी, केंद्रप्रमुख पावरा, सरपंच रंजनाताई, लोकनियुक सरपंच दिलीपदादा राऊत, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई, अंगणवाडी सेविका विमलताई, लढा प्रा.शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष संजय वळवी, बडगुजर सर यांच्या हस्ते करण्यात आले. 


केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. पंचायत समिती सदस्य अशोकदादा राऊत यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी खेळाडू बलवान असतील तरच देश बलवान होऊ शकतो असेही प्रतिपादन केले. अतिशय शिस्तबद्ध उत्तमरीत्या नियोजन केल्याबद्दल शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद माजी सदस्य सितारामदादा राऊत यांनी सांगितले की,आपल्या जीवनात अनेक स्पर्धा येतील व जातीलही त्यामुळे आपण खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने मैदानात उतरले पाहिजे तसेच यश अपयश स्वीकारण्याची तयारीही आपण ठेवली पाहिजे. कोशिश करने वालो की कभी हार नहीं होती. कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्याची भीती नसावी असेही सांगितले. 


मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेच्या प्रथम खो- खो सामन्याचे उद्घाटन झाले. पहिला सामना हुणाखांब विरुद्ध पिंपळखुंटा हा अत्यंत अटीतटीचा सामना झाला. मुलांचे कौशल्य व चपळता पाहून सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त केले. सर्व मुलांना जेवणाची सोय करण्यात आली. पहिला दिवस अत्यंत उत्साहात पार पडला. यामध्ये सर्वच शाळेतील शिक्षकांचें फार चांगले सहकार्य लाभले. या दरम्यान अत्यंत रंगत आलेली होती. गावातील तरुण मंडळानी साउंड सिस्टिमची व्यवस्था करून दिल्याने अधिकच रंगत आली. एकंदरीत दोन दिवसात स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.

 

मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघास सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धा पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक ,केंद्रप्रमुख ,ग्रामस्थ व इतर ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य मिळाले. या स्पर्धेदरम्यान क्रिडा शपथ बागुल सरांनी सादर केली. पंच म्हणून सर्व शिक्षकांनी नियोजंबद्ध सहकार्य केले. केंद्रप्रमुख सिकंदर पावरा यांनी सांगितले की, लहान वयातच विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण होऊन पुढे जाऊन क्रीडा क्षेत्रात प्रगती होण्यासाठी एक चांगला उपक्रम केंद्राने राबविला आहे. केंद्रातील सर्व विद्यार्थी, शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकेश गावित यांनी केले. सुत्रसंचालन रामजी पाडवी यांनी केले व आभार ईश्वर कोकणी सरांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)