नवापुर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांच्या हस्ते उद्घाटन ..

शालेयवृत्त सेवा
0

 


   

नंदूरबार ( शालेय वृत्तसेवा ) :

जि.प.केंद्रशाळा नवापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२२_२३ च्या क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. आर.सी.पवार मॅडम यांची उपस्थिती लाभली. श्री. रमेश चौरे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले खेळाडू निर्माण व्हावे. तसेच विविध खेळाविषयी व भारतीय खेळांडूविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले तसेच मा.पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करणे महत्वाचे आहे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. 


स्पर्धेची नियमावली नवापूर केंद्राचे केंद्रप्रमुख शैलेश राणा सर यांनी सांगितली. स्पर्धेत कबड्डी व लंगडी हे सांघीक खेळ आणि  रनिंग, दोरी उडी, लिंबू- चमचा, गोणपाट शर्यत  हे वैयक्तिक खेळ घेण्यात आले. सर्व स्पर्धेत  एकूण १५ शाळा सहभागी होत्या. कबड्डी खेळात मुलांच्य संघातून जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नवापूर येथील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींच्या संघातून जिल्हा परिषद शाळा घोडजामने येथील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. मान्य मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.  


क्रिडास्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जि.प.शाळांतील नरेश प्रजापति, भविन जगताप, रामदास घोळवे,योगराज भामरे, संदीप राणा , आनंदराव अहिरे, अरविंद एस गावीत, इंदूबाई अहिरे मॅडम , केंद्रातील सर्व शिक्षक बंधू व भगिनी यांचे उत्तम सहकार्य लाभले सर्वांनी परिश्रम घेऊन स्पर्धा उत्तम रितीने पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)