इज्जतगाव संकुलाची सहावी शिक्षण परिषद संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 





नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

इज्जतगाव संकुलाची सहावी शिक्षण परिषद जिपप्राशा भायेगाव ता उमरी येथे संपन्न झाली . त्यात मा.गटशिक्षणाधिकारी उमरी श्री प्रल्हाद कदम साहेबांनी निपुण भारत व त्यातील उपक्रम यावर सखोल मार्गदर्शन केले व शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना जास्त प्रभावी अध्ययन अनुभव देता येते व त्याचा सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन केले.


श्री.जोंधळे सर यांनी निपुण अध्ययन अभ्यास सर्वे श्रेणी तक्त्या मध्ये माहिती भरणे चाचणी घेणे या बद्दल मार्गदर्शन केले भायेगांव येथील मुख्याध्यापक श्री गजभारे सर यांनी छोट्या नाटिकेतून शिक्षण महत्त्व पटवून दिले सूत्र संचालन डॉ.राजेश पावडे यांनी अतिशय उत्कृष्ट केले सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री कदम नागनाथ,श्री कावळे सतीश,सौ सुगंधे ए. व्ही.यांनी उत्तम नियोजन केले व परिश्रम घेतले डिजिटल वर्गामध्ये शैक्षणिक साहित्य प्रदर्शन उद्घाटन झाले त्या वेळी वर्ग सजावट पाहून ग शि अ साहेबांनी कौतुक केले श्री नाईक सर यांनी Google features यामध्ये Google form,drive, वर प्रात्यक्षिक करून घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)