राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन..

शालेयवृत्त सेवा
0

 

अनेक समस्यावर झाली सकारात्मक चर्चा !




नागपूर ( शालेय वृत्तसेवा ) :

नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांना भेटीचे वेळ देऊन राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रश्नावर चर्चा करून सोडविण्याचे आश्वासित केले आहे. 



राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दरवर्षी 5 सप्टेंबर शिक्षक दिन राज्यशिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते 1984 पासून राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शासनाच्या वतीने दोन जादा वेतनवाडी देण्यात येत होत्या परंतु सन 2014 पासून या दोन जादा वेतन वाढी बंद करण्यात आल्या या वेतन वाढीच्या बदल्यात रोख एक लाख रुपये देण्यात येत आहेत परंतु या शासनाच्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. शासनाकडे आमदार खासदार यांच्यामार्फत निवेदन देऊन शिक्षकांची मागणी राज्य शासनाकडे मांडले आहे. राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊन मुख्यमंत्री शिक्षण मंत्री ग्राम विकास मंत्री शिक्षण सचिव प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी केली आहे. 



परंतु शासनाकडून हा प्रश्न अद्यापही न सुटल्याने सन 2013 - 14 चे शासन पुरस्कार प्राप्त शिक्षक उच्च न्यायालयात गेले होते उच्च न्यायालयाने या पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दोन जागा वेतनवाढी देण्यात यावात असा निर्णय दिला आहे परंतु शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक मुख्य कार्यकारी अधिकारी हे या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी राज्याध्यक्ष सुभाष जिरवनकर यांच्या नेतृत्वाखाली बळीराम चापले, सुनील नायक , माया गेडाम, माधव वायचाळ , सुनील गुरव, प्रदीप बिपटे यांच्या स्वाक्षरीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेऊन या शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून निवेदन दिले आहे आणि प्रश्न सोडवण्याचे मागणी केली आहे. 



यामध्ये राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या ज्यादा वेतनवाढी पूर्ववत सुरू करणे, राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देणे, बस व रेल्वे प्रवासात 50 टक्के सवलत देणे, विविध शासकीय समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करणे, केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नतीमध्ये प्राधान्य देणे, जिल्हास्तरीय बदल्यात संवर्ग एक मध्ये समावेश करणे यासह आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या ज्यादा वेतनवाडी पूर्ववत सुरू करण्यात येतील व इतर प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेऊन तेही प्रश्न सोडण्यात येतील असे आश्वासन राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले अशी माहिती राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दशरथ सिंगारे यांनी माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)