मनुष्याला चार अवस्थेतून जावे लागते त्यापैकी किशोर अवस्था महत्त्वाची आहे ...श्री शिवाजी सावते

शालेयवृत्त सेवा
0

गटशिक्षणाधिकारी मा. व्यंकटेश चौधरी यांचे झाले  मार्गदर्शन



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :    

महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व जिल्हा परिषद नांदेड  शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक शाळेमध्ये किशोरवयीन मुलींचे प्रशिक्षण व समुपदेशन घेण्यासाठी आदेशित केल्याप्रमाणे अर्धापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. व्यंकटेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येळेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड या शाळेमध्ये आज दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी किशोरवयीन मुलींचे समुपदेशन येळेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक श्री शिवाजी सावते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.  यावेळी समुपदेशक श्रीमती पुष्पावती वाठोरे यांनी सर्व किशोरवयीन मुलींना समुपदेशन केले . 


यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र येळेगाव व जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येळेगाव येथील शिक्षक महिला अंजली कुलकर्णी , अर्चना तोटरे,  संघमित्रा डोंगरे , पुष्पावती वाघमारे उपस्थित होत्या.  सूत्रसंचालन श्रीमती संघमित्रा डोंगरे यांनी केले तर आभार अर्चना तोटरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)