"राष्ट्रीय दीपस्तंभ" या राष्ट्रीय पुरस्काराने शेख अब्दुल रहीम हे सन्मानित ...

शालेयवृत्त सेवा
0





औरंगाबाद ( शालेय वृत्तसेवा ) :

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार  दिनाचेे औचित्य साधून शनिवार दि. 7 जानेवारी रोजी राष्ट्रीय पत्रकार मेळावा व दीपस्तंभ राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ नाशिकच्या मुं.श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय शालिमार, नाशिक येथे  मोठ्या थाटात संपन्न झाला.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिकच्या वतीने शैक्षणिक अणि समाजिक क्षेत्रात विदयार्थी-शिक्षकांसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल शेख अब्दुल रहीम यांना नाशिक येथे  "राष्ट्रीय दीपस्तंभ" या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.  या भव्य दिव्य कार्यक्रमात मराठी सिनेअभिनेत्री स्मृती प्रभू, अभिनेत्री मेघा पाटील, माजी मनपा सभागृह नेते श्री.दिनकर अण्णा पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते शाल, तसेच शानदार सन्मानचिन्ह सह सन्मान पत्र देऊन शेख अब्दुल रहीम यांना हा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेख अब्दुल रहीम हे एक पेशाने शिक्षक आहेत आणि ते एका सामजिक संस्था हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनद्वारे विद्यार्थी-शिक्षकांच्या समस्यांच्या  निराकरणासाठी अहोरात्र झटत असतात  व त्यांच्या मदतीसाठी दिवसरात्र हजर राहतात तसेच विद्यार्थी-शिक्षकांसाठी वर्षभर अनेक उपक्रम राबवितात तसेच त्यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले आहे. याची दखल घेत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ, नाशिक च्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.



   "शेख अब्दुल रहीम यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना संगितले की "हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनच्या कामाची  ही पावती आहे. हा पुरस्कार शेख अब्दुल रहीम यांनी हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशनची टीम आणि त्यांच्या सर्व चाहत्यांना समर्पित केलेला आहे."

    -शेख अब्दुल रहीम

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)