तायक्वांदो जिल्हा क्रिडास्पर्धेत पारडीच्या शाळेने रचला इतिहास

शालेयवृत्त सेवा
0

पारडीच्या शाळेने  रचला इतिहास       

पारडीच्या शाळेने  रचला इतिहास


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :    

मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारिमुळे   होऊ न शकलेल्या क्रिडा स्पर्धा यावर्षी जोमात नव्या उत्साहाने सुरू झाल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, नांदेड तर्फे आयोजित जिल्हा स्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत  पारडीच्या जिल्हा परिषद शाळेने  दि.8 डिसेंबर रोजी क्रिडा स्पर्धामधिल आपला दबदबा कायम ठेवत 7 मुलींनी व 5 मुलांनी अशा 12 खेळाडुंनी नांदेड  जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. 


ग्रामीण भागात गुणवत्तेची खाण असते हे येथील मुलांनी वारंवार सिद्ध केले आहे. जिल्हा परिषद शाळा म्हंटले की लोकांच्या नजरेसमोर दिसतो तो असुविधांचा पसारा.. परंतु येथील मुख्याध्यापक किसवे एम एल, प्रा पदवीधर बालाघाटे डी पी व सर्व शिक्षकवृंद कसल्याही अडचणींची तमा न बाळगता ऊन, पाऊस व थंडी कसलेही वातावरण असो विद्यार्थ्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन त्यांना अष्टपैलू कसे बनवावे यात मग्न असतात.त्यातूनच या 12  खेळाडूंच्या अप्रतिम कामगिरीने त्यांची  लातूर येथे विभागीय क्रिडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


पारडी शाळेने याअगोदर खो खो, धावणे, रिले स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, उत्कृष्ट रंगरंगोटी, विविध नावीन्य पूर्ण उपक्रम यातून मा. पंचायत राज समितीची वाहवा मिळवली आहे.जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत  सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवणारी नांदेड जिल्हाभरातील जिल्हा परिषदेची पारडी ही एकमेव शाळा आहे.या स्पर्धकांना आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक मास्टर बालाजी पाटील  जोगदंड,सौ.वृषालीताई पाटील जोगदंड, प्रशिक्षक ॠषीकेश टाक , अतुल गोडबोले यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा क्रीडा कार्यालय इंडोर हॉल येथे दिनांक ८ डिसेबर 2022 रोजी आयोजीत स्पर्धेचे उद्घाटन क्रिडाधिकारी प्रविण कोंडेकर, अँड. शितल जोंधळे, मनोहर सुर्यवंशी, राजेंद्र सुगावकर यांची प्रमुख उपस्थीती होती. 


विद्यार्थ्यांना प्रोत्साहन शाळेचे मुख्याध्यापक श्री किसवे एम. एल., श्री बालाघाटे डी.पी., श्री देशमुख जी.एल.,सौ. कदम जे.ए.,सौ.गंगाखेडकर सी.पी.,सौ इंगोले एस.एस.,सौ.कदम आर. जी.,श्री विठ्ठल पाटील डिकळे, श्री बाळू पाटील पवार,श्री सचिन गायकवाड,श्री शरद पाटील पवार,श्री व्यंकट पाटील डिकळे यांनी दिले.. तू लढ गड्या.. पदकांची शाळेसाठी लूट कर गड्या..विद्यार्थ्यांच्या कामगिरीने गाव आता मारतोय उड्या.. पारडी ग्रामवासी आनंदाने हुरळून गेले आहेत. या कामगिरीचे केंद्रप्रमुख बाबुराव फसमले, शि वि अ सर्जेराव टेकाळे, कार्यकुशल व सतत नवीन बाबींना प्रोत्साहन देऊन आढावा घेणारे गटशिक्षणधिकारी रवींद्र सोनटक्के व डायटचे अधिव्याख्याता चंद्रकांत धुमाळे यांनी कौतुकाची थाप देत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)