प्रा.शा. मेंढला खु. येथे शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

संकुल कन्या अर्धापूर केंद्रातील सर्व शिक्षकांची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंढला खु. येथे सरपंच दत्ता पाटील नवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी लोकदाजी गोडबोले, केंद्रप्रमुख विकास चव्हाण, शाळेसाठी जमीन दान देणारे बंधू कुंडलिक पाटील नवले व ज्ञानेश्वर पाटील नवले, प्रभाकर पाटील नवले, सचिन नवले, यांची प्रमुख  उपस्थिती होती. 


परिषदेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.  परिषदेस उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी स्मिता नवले व प्रणाली वानखेडे यांनी स्वागतगीत गायले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती छाया दिनकर यांनी केले. स्टुडन्ट पोर्टल, व्ही स्कूल ॲप, तसेच निपुण भारत अंतर्गत माता पालक गटाच्या प्रभावी बैठकीबाबत  केंद्रप्रमुख विकास चव्हाण यांनी प्रशासकीय बाबींचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.  


मा. विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार 1961 च्या शांती पथकातील अधिकारी व कांगो येथील युद्धातील अतुलनीय पराक्रमासाठी परमवीर चक्र प्राप्त कॅप्टन गुरुबचनसिंह सलारिया यांची जयंती साजरी करण्यात आली.  विद्या अमृत महोत्सव नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा वापर करून अंतर्गत पाच मिनिटांचा पाठ दीक्षा अँपवर उपलोड करणे व मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण संबंधी सविस्तर मार्गदर्शन सुलभक सतीशकुमार वाकोडे यांनी केले.  चला शिकुया प्रयोगातून या विषयावर अनुभवपूर्ण विश्लेषण विज्ञान विषय शिक्षक मुकुंद जोशी यांनी केले. 


अर्धापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. व्यंकटेश चौधरी यांनी दुपार सत्रात शिक्षण परिषदेस भेट देऊन शिक्षण परिषद ही स्नेहसंमेलन न होता ज्ञान परिषद व्हावी याविषयी उपस्थित सर्व शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.  अर्धापूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री लोकदाजी गोडबोले यांनी शिक्षण परिषदेस भेट देऊन परिषद नियोजनानुसार  चालू असल्याबाबत आढावा घेऊन सर्वाना शुभेच्छा दिल्या. 


निष्ठा 4.0 प्रशिक्षणाबाबत सुलभक अशोक गायकवाड व सुलभक विनोद सोनटक्के यांनी बालरक्षक चळवळ याविषयी मार्गदर्शन केले. सर्व उपस्थितांच्या मोबाईलमध्ये बालरक्षक अँप डाउनलोड करून घेतले.    कुप्पम, आंध्रप्रदेश येथून विज्ञान व गणित विषयांचे उच्च प्रक्षिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल विषय शिक्षक मुकुंद जोशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 


शिक्षण परिषद वेळेवर सुरुवात करून संपूर्ण परिषद नियोजनानुसार पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुख विकास चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.  शिक्षण परिषदेसाठी सुंदर रांगोळी, फलकलेखन व सजावट श्रीमती प्रज्ञा जोंधळे यांनी केली.  दुपारच्या स्वादिष्ट झुणका भाकर ठेचायुक्त भोजनाची व्यवस्था सहशिक्षक प्रल्हाद माटे यांनी केली. 


आजच्या शिक्षण परिषदेस सचिन नवले, ग्रामपंचायत कर्मचारी प्रभाकर वानखेडे, त्रिमुख वानखेडे, गोविंद मामा वानखेडे, रेणुका मावशी, उषा मावशी, मीना मावशी, संतोष गुळगुळे, स्काऊट गाईडचे विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.   शिक्षण परिषदेचे प्रभावी व उत्कृष्ट सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन विषय शिक्षक मुकुंद जोशी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)