जि.प. प्राथमिक शाळा उमरवाडी च्या विद्यार्थ्यांनी "खरी कमाई" उपक्रमाअंतर्गत भरवला बाजार!

शालेयवृत्त सेवा
0

उपक्रमशील शिक्षक संघपाल सोनोने यांचा उपक्रम !


वाशीम (शालेय वृत्त) :  

पंचायत समिती मालेगाव येथील जि. प. प्रा. शाळा उमरवाडी येथे आज दिनांक २४ डिसेंबर रोजी सह. शिक्षक श्री संघपाल सोनोने सर यांच्या संकल्पनेतून "खरी कमाई" हा उपक्रम राबविण्यात आला.

      

विद्यार्थ्यांना अनुभवातून व्यवहारज्ञान व व्यवसाय ज्ञान मिळावे यासाठी शाळेच्या प्रांगणात विविध खाद्य पदार्थ पाणीपुरी, इडली, गुलाब जामुन, खरमुरे, भजे, पोहे, आलुपोहे, आलुपोंगा, चहा, खस्ता, पापड, ईत्यादी ची एकुण 15 स्टॉल लावून बाजार भरवला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री साहेबराव राठोड सर सह. शिक्षक श्री दिनेश घुगे सर व  सह. शिक्षिका मनकर्ना शिंदे मॅडम यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

     

आजच्या कार्यक्रमात अनुभवातून शिक्षण व व्यवहारातुन शिक्षण या उद्देशाने भरवलेल्या "खरी कमाई" उपक्रमाअंतर्गत 15 स्टॉल होते. ज्यांचा एकुण व्यवसाय  पाच हजारांचा झाला.

      

या उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबरच शा. व्य. समिती अध्यक्ष श्री सुखनंदन खुळे व उपाध्यक्ष सौ. नंदाताई चोंडकर व सर्व सदस्य तसेच गावातील सरपंच सौ. कमलाबाई जामकर व पो. पा. सुनिताताई रा. धंदरे तसेच गावातील पालक वर्ग, माता पालक वर्ग यांनी उपस्थिती लावून खरेदीचा आनंद घेतला व विद्यार्थी व शिक्षक यांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांनी व्यवसायात गुंतवलेले भांडवल, झालेली विक्री आणि त्यातुन मिळालेला नफा किंवा तोटा याविषयीचे अनुभव कथन केले.


त्यानंतर मु.अ. श्री राठोड सर यांनी व्यवसायाभिमुख शिक्षणाचे महत्व सांगितले. व समारोपात स. शि. श्री दिनेश घुगे यांनी व्यवसायाची सचोटी कशी शिकावी हे समजून सांगितले व शेवटी आभार प्रदर्शन स. शि. मनकर्ना शिंदे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वयंपाकी श्री डिगांबर जामकर,लक्ष्मीबाई जामकर व शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनी सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)