जि.प. प्रा. शाळा वायवाडी येथे सहावी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 


 

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वायवाडी  येथे ६ वी शिक्षण परिषद संपन्न झाली. शिक्षण परिषदेचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्यामराव हरी आडे होते.तर प्रमुख पाहुणे रवींद्रजी जाधव ग.शि.अ. हिमायतनगर, शिक्षण विस्तार अधिकारी डवरे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी अरुणजी पाटील, केंद्रप्रमुख संजय जान्ते, बालाजी राठोड माजी पं.स. सदस्य, परसरामजी पवार माजी.कृ.उ.बा. स. सभापती हिमायतनगर  हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख संजय जान्ते यांनी केले.


शिक्षण परिषदेतील सर्व विषयांवर प्रकाश अरुण पाटील (शि.वि.अ.) तसेच गटशिक्षणाधिकारी रवींद्र जाधव साहेब यांनी प्रकाश टाकला. याच कार्यक्रमात परमवीरचक्र प्राप्त मेजर शैतान सिंह यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शंकर गच्चे यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे सहशिक्षक दत्ता मुसांडे, कृष्णा पांचाळ यांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक के.बी.कल्याणकर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)