डाॅ. विद्या बोरसे यांच्या साहित्य कृतीस राज्य वाड्मय पुरस्कार प्राप्त

शालेयवृत्त सेवा
0

 डाॅ. विद्या बोरसे यांच्या साहित्य कृतीस राज्य वाड्मय पुरस्कार



मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) :

"कोरा कागद निळी शाई " या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला. प्राध्यापक  डॉ. विद्या सुर्वे बोरसे यांना राज्य शासनाच्या मराठी विभागासाठी देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार २०२१ मराठी बालसाहित्याची समीक्षा असलेला 'कोरा कागद, निळी शाई' या पुस्तकाला ५० हजार किमतीच्या पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. विद्या सुर्वे या वाशी येथील मुंबई विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे सचिव डॉ. सुभाष बोरसे यांच्या पत्नी आहेत.


प्राध्यापिका केवळ शैक्षणिक क्षैत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही नेहमीच अग्रेसर असतात. शिक्षक पेक्षा म्हणजे एक सामाजिक बांधिलकी. विद्यार्थी, पालक व समाजातील विविध घटकांचा संबंध यातून संवेदनशील मनातून प्रतित होणारे साहित्य म्हणजे विद्या बोरसे मॅडमची अभिव्यक्ती. त्यांच्या या पुरस्कारामुळे शिक्षण क्षैत्रात आनंद निर्माण झाला आहे. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू असताना लेखनाचा निर्विवाद आनंद व सृजनशील कृती मँडम व्यक्त केल्याचे समाजातील अनेक क्षैत्रातील व्यक्तींनी मँडमचे अभिनंदन केले आहे. 

 

धुळे जिल्ह्यातील वेल्हाणे गावाचे सरपंच पद देखील भूषविले आहे. त्याच बरोबर त्यांनी वाड्मयबरोबरच इतरही सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. विविध ठिकाणी परीक्षक, व्याख्याता, समीक्षक म्हणून त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे.  राज्यातील वेगवेगळ्या वर्तमानपत्रात त्यांनी लिखाण केले आहे त्यांच्या बालसाहित्य आकलन व समीक्षा हा समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. या ग्रंथाला चार राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना अनेक ठिकाणी निमंत्रित करून व्याख्यान आयोजित केली गेली आहेत. काव्याग्रह या नियतकालिकात संपादिका म्हणून काम पाहिले आहे. मातोश्री स्नेहप्रभा कृत्यज्ञाता पुरस्कार, नरेंद्र मारवडे स्मृती साहित्य पुरस्कार, उत्कृष्ट समीक्षा लेखनासाठी ताईसाहेब कदम पुरस्कार, अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेचा लीलावती भागवत समीक्षा पुरस्कार त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत सावित्रीबाई फुले अध्यासनाचा कार्य गौरव पुरस्कार तसेच इतर वाड्मयासाठी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.



डॉ. विद्या सुर्वे बोरसे या नाशिक, पंचवटी येथील हिरे महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. प्रा विद्या सुर्वे बोरसे यांच्या कार्याचा परिचय आम्ही आमच्या वाचकांसाठी देत आहोत. 


• वेल्हाणे, ता जि धुळे येथे 2015 ते 2021 पाच वर्षेपर्यंत सरपंच पदाची यशस्वीपणे धुरा सांभाळली.


• गांधीनगर, गुजरात येथे सन 2017 ह्या वर्षी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सरपंच परिषदेत निमंत्रण व सक्रिय सहभाग.


• बालसाहित्य समीक्षक, भाषांतरकार ही महाराष्ट्रात असलेली ओळख.


• . ● 'बालसाहित्य : आकलन आणि समीक्षा' हा समीक्षाग्रंथ प्रकाशित. या ग्रंथाला विविध संस्थांचे चार राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.


• ऊपक्रमशिल आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ही विशेष ओळख. मागील दहा वर्षापासून महाविद्यालयात अध्यापनकार्य. सुरुवातीला चांदवड येथे बीए आणि एमए च्या वर्गांना अध्यापन केले. त्यानंतर मालेगाव येथील महाविद्यालयात अध्यापन.


• अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तसेच साहित्य अकादमी, विद्यापीठ अनुदान आयोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये अध्यक्ष, निमंत्रित शोधनिबंध वाचक म्हणून सहभाग व मार्गदर्शन.


९४ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे परिसंवादास निमंत्रण व व्याख्यान . ९५ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर येथे परिसंवादास निमंत्रण व व्याख्यान . • पहिले राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन 'आई प्रतिष्ठान' मालेगाव येथे परिसंवादास निमंत्रण व व्याख्यान प्राध्यापक विद्या सुर्वे बोरसे म्हणजे आमच्यासाठी एक मार्गदर्शक व आदर्श व्यक्तिमत्त्व आहे असे प्रतिपादन हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केले आहे. त्याच्या पुरस्कारासाठी आमच्या संपादक मंडळ व वाचकांकडून हार्दिक अभिनंदन व पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)