उमरवाडी जि.प. शाळेत राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 गाडगेबाबांची दशसुत्री सर्वांनी अवलंबावी - सोनोने





वाशिम ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरवाडी पं.स मालेगाव येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला.


शाळेचे मुख्याध्यापक श्री साहेबराव राठोड सर यांनी विद्यार्थ्यांचे उद्बोधन करतांना गाडगे बाबांनी शिक्षणासाठी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. गाडगेबाबांनी शिक्षण प्रसारासाठी शाळा, वसतिगृहं, महाविद्यालय काढण्याचं काम केलं. तत्कालीन समाजाला अंधश्रद्धेपासून दूर करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं होतं. शिक्षणामुळे मानवाचा, समाजाची प्रगती होते. गाडगेबाबा म्हणायचे “मायबापहो तुम्हाला काहीतरी मिळालं पण तुमच्या मुलाबाळांच्या नशिबी तेही येणार नाही, शिक्षण हे मोठं पुण्याचं कामं आहे, आपण शिका व इतरांनाही शिकवा.


अंधश्रद्धेला बळी पडू नका हा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. तसेच सह. शिक्षक श्री दिनेश घुगे, मनकर्ना शिंदे मॅडम यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सह. शिक्षक संघपाल सोनोने सर यांनी संत गाडगेबाबा यांचा दशसूत्री संदेश सांगितला.


भुकेलेल्यांना = अन्न

तहानलेल्यांना = पाणी

उघड्यानागड्यांना = वस्त्र

गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत

बेघरांना = आसरा

अंध,पंगू रोगी यांना = औषधोपचार

बेकारांना = रोजगार

पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय

गरीब तरुण-तरुणींचे = लग्न

दुःखी व निराशांना = हिंमत

गोरगरिबांना = शिक्षण

हाच आजचा रोकडा धर्म आहे ! 

हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!

 

तसेच इयत्ता ७वी ची विद्यार्थिनी कु. प्रतिक्षा चोंडकर, भाग्यश्री ठोंबरे, मुक्ता पांडे, कोमल शेळके यांनी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जिवन पट आपल्या मनोगतातून मांडला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)