आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळच्या विद्यार्थ्यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवत तब्बल २१ खेळ प्रकारात प्रावीण्य

शालेयवृत्त सेवा
0

 

तोरणमाळच्या विद्यार्थ्यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले



नंदुरबार  (शालेय वृत्तसेवा) :

क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय  मैदानी क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय निवासी शाळा तोरणमाळच्या विद्यार्थ्यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवत तब्बल २१ खेळ प्रकारात प्रावीण्य प्राप्त करत विभागीय स्पर्धेसाठी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जिल्हा परिषद नंदुरबार  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे साहेब, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहासदादा नाईक, शिक्षण सभापती गणेशदादा पराडके, प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश चौधरी यांनी  विद्यार्थ्यांचे व शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 


१७ वर्षाखालील मुलांमध्ये १५०० मी. धावणे प्रथम हिरेश पवारा ४०० व ८०० मी धावणे प्रथम निलेश पवारा, ११० मी हर्डल्स प्रथम जयसिंग पावरा व व्दितीय दिनकर पावरा, भाला फेक- प्रथम जयसिंग पावरा, थाळी फेक द्वितीय जयसिंग पावरा, बांबू उडी -प्रथम हिरेश पावरा  व द्वितीय बकशा पावरा, ५ किमी चालणे मुले द्वितीय बकशा पावरा, ४०० मी. धावणे मुली द्वितीय सरिता पावरा, ८०० मी. मुली प्रथम केसमा पावरा, ३ किमी. चालणे  मुली प्रथम सोकी पावरा, लांब उडी मुली द्वितीय कोविता नाईक,  ऊंच उडी द्वितीय इना पावरा, रिले संघ मुली द्वितीय १०० मी. हर्डल्स मुली द्वितीय मिला चौधरी, हातोडा फेक मुली प्रथम बबली मोरे. १४ वर्षाखालील मुले व मुली, १०० मी. धावणे तृतीय अनाज्या पावरा, ४०० मी. धावणे द्वितीय आदेश पावरा, १०० मी. धावणे द्वितीय  संदीप वळवी ८० मी. हर्डल्स द्वितीय मिनेश पावरा व मुली प्रथम रंगिता नाईक, गोळाफेक- मंजीला पावरा. 


या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्याध्यापक सुधीर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या त्यासाठी क्रिडाशिक्षक राहुल मावची, रविंद्र शिंदे, कोमल पाडवी व सुरेश पावरा या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)