क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर.. | State Teachers Awards

शालेयवृत्त सेवा
0

 

राज्यातील १०८ आदर्श शिक्षकांची झाली निवड : ३ जानेवारीला होणार प्रदान !




मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

सन २०२१-२२ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची निवड केली आहे.


समाजाची नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाच्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात.


राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येणार आहे. या पुरस्काराची रक्कम रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) आहे. तसेच राष्ट्रीय /राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रुपये १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) अदा करण्यात येते.


सन २०२१-२२ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक ०१ सप्टेंबर, २०२२ रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने संदर्भ क्र. ५ येथील दिनांक ०५ सप्टेंबर, २०२२ च्या पत्रान्वये शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली. त्यानुसार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.


प्राथमिक (३८ ) माध्यमिक (३९ ) आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक प्राथमिक ( १८) थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार ( ८) विशेष शिक्षक कला/क्रीडा (१+१) दिव्यांग शिक्षक/ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक स्काऊट/गाईड (१+१) एकूण पुरस्कार संख्या पुरस्कार संख्या १०८ आहे.


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे या सोबत जोडलेल्या परिशिष्ट १ ते ७ प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत. पुरस्कार वितरण कार्यक्रम दि.०३ जानेवारी, २०२३ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी मुंबई येथे होणार आहे.


सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२२१२२९१६१००२७९२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने प्रसिध्द करण्यात आले आहे.


.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)