गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन

शालेयवृत्त सेवा
0

 




जन्म 22 डिसेंबर 1887 जन्मगाव तामिळनाडूतील इरोड नावाच्या छोट्या गावात झाला. शिक्षण दहा वर्षाच्या असताना त्यांचा प्राथमिक शाळेत प्रथम क्रमांक आला त्यामुळे त्यांचे माध्यमिक शिक्षण मोफत झाले ,माध्यमिक शिक्षणाच्या गणित विषयात प्रथम क्रमांक मिळाल्याचे अनेक पारितोषिक मिळवली होती. गणितात त्यांची विलक्षण बुद्धिमत्ता होती कधी कधी खूप अवघड प्रश्न ते शिक्षकांना विचारायचे. बालपण - श्रीनिवास रामानुजन यांच्या वडीलांचे नाव कुप्पुस्वामी व आई कोमलतम्मा हे गरीब पारंपरिक अयंगर परिवारातील होते.


बालपणी ते आपापले पाटी पेन्सिल घेऊन उदाहरणे सोडवत बसत होते. एकदा शेजारी असणाऱ्या महाविद्यालयीन मुलाला त्यांनी त्यांच्या गणिताचे पुस्तक मागितले .त्यांनाही आश्चर्य वाटले रामानुजने त्याच्या पुस्तकातले सर्व  गणिते कुणीही न शिकवता सोडवले होते. हे पाहून त्यांना आणखीनच आश्चर्य वाटले. तो मुलगा महाविद्यालयातील आणखी  नवनवीन गणिताचे पुस्तके त्यांना आणून देऊ लागला .वयाच्या तेरावे वर्षी रामानुजन ने  ग्रंथातील त्रिकोणी वर त्रिकोणमितीवर एक पुस्तक वाचले. 15 व्या वर्षी त्यांनी जॉर्ज शूब्रिज कार यांच्या विशुद्ध व उपयोजित गणितातील प्रारंभिक निष्कर्षाचा सारांश या ग्रंथाची दोन खंडात उपलब्ध केली. सुमारे 6000 प्रमेयांच्या या संग्रहाने त्यांच्या प्रतिभेला आव्हान मिळाले  .1903 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली फक्त गणिताकडे लक्ष दिले. बाकी विषयात अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे त्यांची शिष्यवृत्ती बंद झाली .आणि 1906 साली औपचारिक शिक्षण बंद झाले.


संशोधन व मानव जातीला फायदे -औपचारिक शिक्षण थांबले पालकांनी रामानुजन यांचे लग्न करून टाकले. कुटुंबाची जबाबदारी म्हणून त्यांनी नोकरी शोधली. त्यांच्या मदतीला त्यांचे आवडते गणितच धावून आले .त्यांना मद्रासच्या पोर्ट ऑफ ट्रस्ट च्या लेखा विभागात लिपिक म्हणून नोकरी मिळाली. त्यांचा पहिला पगार 30 रुपये होता. कार्यालयात वेळ मिळाला की ते संशोधनावर लेख लिहित. त्यांचे ते लेख" इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या" नियतकालिकात प्रकाशित झाले. मद्रास येथेही गणिताच्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळाली. शिक्षण तज्ञाना त्यांच्या बौद्धिक कौशल्य ज्ञात झाले. त्यांच्या शिफारशीमुळे 1 मे 1913 पासून गणितात आपल्या संशोधन चालू ठेवण्यासाठी त्यांना विद्यापीठाकडून ७५ रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. 


रामानुजन यांनी आपली 120 प्रेमेय व सूत्रे (थेअरपम्स ऑफ फार्मूले) केंब्रिज विद्यालयाच्या ट्रिनीटी महाविद्यालयातील फेलो प्रसिद्ध गणितज्ञ प्राध्यापक गॉफ्रेड यांना पाठवली .ती  पाहून प्राध्यापकाने रामानुजनला इंग्लंडला पाठवण्याची व्यवस्था केली. मद्रास विद्यापीठाने त्यांना दोन वर्षासाठी 250 पौंडची शिष्यवृत्ती मंजूर केली. व हार्डी यांनी रामानुजनच्या इंग्लंडचा येणे जाणे  राहणे खाणे याची   व्यवस्था स्वतः  स्वखर्चाने केली . त्यांच्या आई-वडिलांनी त्यांनी विदेशात जाऊ नये अशी इच्छा होती पण मित्र व शिक्षक यांनी समजावल्यावर तेही तयार झाले .17 एप्रिल 1914 ला ते इंग्लंडला पोहोचले. त्याच दरम्यान महायुद्धातील सुरुवात झाली. हिवाळा सुरू झाला रामानुजन लाकडाक्याची थंडी सहन करण्यासाठी गेले कठीण गेले .ते रूढीप्रिय कट्टर ब्राह्मण होते .शाकाहारी असल्याने स्वतःचे जेवण स्वतः बनवत. त्यांना एकटेपणाने जाणवू लागला .हार्डी त्यांचे  खरे मित्र मार्गदर्शन तत्त्वज्ञ होते. त्यांनी मद्रास विद्यापीठाला पत्र लिहिले रामानुजन एक महान विद्वान गणितज्ञ आहेत ,त्यामुळे मद्रास विद्यापीठाने दोन वर्षाची शिष्यवृत्ती वाढवून पाच वर्षे केली .


1916 साली त्यांना बी. ए .पदवी मिळाली. इंग्लड येथे पाच वर्षात त्यांनी 25 शोधनिबंध  प्रकाशित केले. त्यामुळे ते गणिताच्या विश्वात लोकप्रिय झाले. 1918 मध्ये इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने त्यांना फेलो करून घेतले. हा सन्मान मिळणारे ते दुसरे भारतीय होते .1917 मध्ये रामानुजन आजारी पडले प्रथम टीबी आहे असे समोर आले पण नंतर समजले की पोषणमूल्य नसलेला आहार व जीवनसत्वाची कमतरता यामुळे ते आजारी पडले होते. डॉक्टरच्या म्हणण्यानुसार त्यांना कोरडे हवामान असावे. यासाठी 1919 ला ते भारतात परत आले. मित्र व हीत चित्तकांनी उपचार करूनही 26 एप्रिल 1920 ला त्यांचे निधन कुंभकोणम येथे झाले . त्यावेळी ते फक्त 32 वर्षाचे होते .जाड जुड अशा  तीन वहयामध्ये त्यांचे गणितातील संशोधन कार्य आजही  "रामानुजन नोटबुक्स " म्हणून ओळखले जाते.


 पुरस्कार -

1) 1 मे 1913 मद्रास महाविद्यालया कडून शिष्यवृत्ती.

2 )ऑक्टोबर 1918 मध्ये लढत जा रॉयल सोसायटीने त्यांना फेलो करून घेतले .

3) फेब्रुवारी 1918  नौदल अभियंता आरदेशजी खोरदेशजी यांना पहिला तर रामानुजन लादुसरा सर्वात मिळाला सरदार दुसरा सन्मान मिळाला होता.


 संदर्भ ग्रंथ -

1)महान वैज्ञानिक प्राध्यापक सुरेश शहा .

2)इंडियन सायन्स अँड सायंटिस्ट


( संकलन : श्रीमती उर्मीला परभणकर )

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)